शिक्षकांनी तंत्रस्नेही होणे काळाची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:26 IST2021-08-18T04:26:35+5:302021-08-18T04:26:35+5:30

सेवानिवृत्त शिक्षक विस्तार अधिकारी बाळकृष्ण गडाख, सेवानिवृत्त केंद्रप्रमुख विठ्ठल कोरडे, सेवानिवृत्त शिक्षक निवृत्ती डगळे, लीला कोंडार, हरिभाऊ बांबेरे, बुधाजी ...

Teachers need time to become tech-savvy | शिक्षकांनी तंत्रस्नेही होणे काळाची गरज

शिक्षकांनी तंत्रस्नेही होणे काळाची गरज

सेवानिवृत्त शिक्षक विस्तार अधिकारी बाळकृष्ण गडाख, सेवानिवृत्त केंद्रप्रमुख विठ्ठल कोरडे, सेवानिवृत्त शिक्षक निवृत्ती डगळे, लीला कोंडार, हरिभाऊ बांबेरे, बुधाजी पेढेकर यांचा सेवापूर्ती गौरव तसेच शिक्षक विस्तार अधिकारी निर्मला साठे, केंद्रप्रमुख भाऊसाहेब जगताप यांची बदली झाली म्हणून निरोप व शिक्षक विस्तार अधिकारी सविता कचरे, केंद्रप्रमुख सोना लहामटे, गायकवाड, तळपाडे यांचे बीटस्तरावर स्वागत असा संयुक्त सोहळा पिचड माध्यमिक विद्यालयात पार पडला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षपदावरून कुमावत बोलत होते.

शिक्षिका रेखा लावरे व रंजना शिंदे यांनी फुलांची रांगोळी काढली. पिंपळगाव नाकविंदा, विठा केंद्र व राजूर बीट यांच्या वतीने हा कृतज्ञता गौरव व स्वागत सोहळा शनिवारी आयोजित केला होता. सूत्रसंचालन अनिल कुटे यांनी केले. शिक्षणविस्तार अधिकारी सविता कचरे, बबन निघुते, शिक्षक संजय शेळके, जयसिंग कानवडे, काळू तपासे, विठ्ठल चव्हाण, नामदेव सोंगाळ, भाऊराव सुपे, दीपक बोऱ्हाडे, रेखा लावरे, रंजना शिंदे, शकुंतला आवारी यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. पी. डी. पवार यांनी आभार मानले.

Web Title: Teachers need time to become tech-savvy