शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण युद्ध थांबवायचे की सुरु करायचे...! ट्रम्प यांच्याकडे फक्त ७ दिवस! '१ मे' पूर्वी मोठा निर्णय घेण्याची शक्यता
2
बंगालमध्ये पहिल्या टप्प्यातील १५२ पैकी भाजपा किती जागा जिंकणार? अमित शाहांनी थेट आकडाच सांगितला
3
Top Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
4
'विशाल पाटलांना तिकीट मिळणार नाही हे जयंत पाटील-विश्वजित कदमांना माहीत होतं"; पडळकरांचा मोठा गौप्यस्फोट
5
युद्धाची तयारी की ढासळणारी अर्थव्यवस्था? रशियानं २२ टन सोने विकले; जागतिक बाजारपेठेत खळबळ
6
अमेरिकेच्या युद्धनौकेवर अचानक माकडाने हल्ला चढवला; होर्मुझच्या मोहिमेवर निघालेले...
7
तुमच्या घरात तुळशीच्या बाजूला ‘या’ गोष्टी ठेवल्या नाही ना? लक्ष्मी नाराज होईल, निघून जाईल!
8
विधानपरिषद निवडणुकीच्या हालचालींना वेग! भाजपने नावे पाठवली, मविआतर्फे उद्धव ठाकरे?
9
"डोनाल्ड ट्रम्प यांनी पदाची प्रतिष्ठा घालवली"; 'भारताला नरक' म्हणताच अमेरिकन खासदार कृष्णमूर्ती भडकले
10
ChatGPT नं एका झटक्यात संपवली १६ अब्ज डॉलरची कंपनी; अवघ्या ४ वर्षात शेअर्समध्ये घसरण, काय घडलं?
11
राजस्थान विधानसभेला बॉम्बने उडवण्याची धमकी, IPL सामन्यापूर्वी जयपूरमध्ये खळबळ 
12
कित्येकींनी साकारल्या राणी सईबाई; पण जिनिलीयाला पाहून चाहते म्हणतात- "सौंदर्य आणि शक्ती..."
13
Sandeepa Virk : प्रेग्नन्सी टेस्ट, ४ महिने तिहार जेल; अभिनेत्रीचा खळबळजनक खुलासा, म्हणाली, "मला रात्रीच्या वेळी..."
14
ही इलेक्ट्रीक एसयुव्ही लाँच काय झाली, ३० मिनिटांत १०,००० बुकिंग; पहा कोणती एवढी कंपनी डिमांडमध्ये आहे...
15
मंत्रिमंडळात एकत्र बसायचे, बाहेर विरोधात कुरघोड्या करायच्या? शिंदे-नाईक वादावर नागरिक नाराज!
16
शाहरुखची मॅनेजर पूजा गुरनानीनं वांद्य्रात खरेदी केले ३ आलिशान फ्लॅट्स; एका चौरस फुटाची किंमत ₹८४,०००
17
'रशियासोबत अमेरिकेनं जे केलं ते आपल्यासोबत..,' म्हणून अनेक देश वाढवताहेत आपला सुवर्ण साठा; प्रकरण काय?
18
शेजारणीकडे दिली घराची चावी अन् तिजोरीच गायब, ३४ लाख रुपयांचे दागिने चोरीला!
19
९ तासांत २ बलात्कार अन् १ हत्या, आधी मित्राच्या बायकोवर बळजबरी मग...; आरोपी राहुलचं सत्य उघड
20
केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते ‘भारत टॅक्सी’ ॲपचा शुभारंभ
Daily Top 2Weekly Top 5

कर वसुली निराधार

By admin | Updated: May 23, 2014 01:28 IST

अहमदनगर : महापालिका अस्तित्वात येऊन ११ वर्षे उलटली तरी अजूनही कर वसुलीला शासनाची मान्यताच घेण्यात आलेली नाही.

अहमदनगर : महापालिका अस्तित्वात येऊन ११ वर्षे उलटली तरी अजूनही कर वसुलीला शासनाची मान्यताच घेण्यात आलेली नाही. नगरपालिका नियमानुसार कर वसुली केली जात असल्याचा प्रकार स्थायी समितीच्या सभेत उघडकीस आला. प्रशासनानेही तशी कबुली दिली. अर्थसंकल्पावर चर्चा करण्यासाठी महापालिकेच्या स्थायी समितीची सभा सुरू आहे. गुरूवारी तिसर्‍या दिवशी सभा सुरू झाली. त्यावेळी नगरसेवक दीप चव्हाण यांनी वृक्षकराची माहिती मागविली. प्रभाग अधिकारी साबळे यांनी ही माहिती देताना १९९७ च्या ठरावानुसार कर वसूल केला जात असल्याचे सांगितले. नेमका हाच मुद्दा दीप चव्हाण यांनी पकडला. २००३ साली महापालिका अस्तित्वात आली. तेव्हाच नगरपालिकेचे नियम संपले. महापालिका नियमानुसार कारभार सुरू झाला. मात्र, नगरपालिकेच्या नियमानुसारच कर वसुली होत असल्याची बाब चव्हाण यांनी उघडकीस आणली. महापालिका वसूल करत असलेला कर हा बेकायदा असून त्यातून जनतेची लूटमार सुरू असल्याचा आरोप चव्हाण यांनी केला. नगरसेवक बाळासाहेब बोराटे, सचिन जाधव, उमेश कवडे यांनी चर्चेत सहभाग घेतला. (प्रतिनिधी)महापालिका अस्तित्वात आल्यानंतर पहिल्याच कार्यकारी मंडळाने (नगरसेवकांनी) महापालिकेचा उपविधी स्थायी समितीत मंजूर करावा. तेथून तो महासभेत मंजूर होईल. त्यानंतर तो मंजुरीसाठी शासनाकडे पाठविला जाईल. शासनाने त्याला मंजुरी दिल्यानंतर तो राजपत्रात प्रसिध्द होईल. त्यानंतर नागरिकांकडून कर वसुली सुरू केली जाईल. नगरपालिका संपुष्टात येऊन महापालिका अस्तित्वात आली तरीही महापालिकेच्या उपविधींना शासनाची मान्यता नाही. नगरपालिका नियमानुसारच महापालिका कर वसुली करत आहे. प्रशासनाच्यावतीने सहाय्यक आयुक्त संजीव परसरामी यांनी ही बाब सभेत कबूल केली. महापालिका नागरिकांकडून बेकायदा कर वसुली करत आहे. कर वसुलीची बाब न्यायप्रविष्ठ झाली तर त्याला जबाबदार कोण? मी ७ वर्षापूर्वी हा विषय महापालिकेत मांडला होता. त्यावेळच्या अधिकार्‍यांनी मंजुरी घेतो असे सांगितले पण अजून मंजुरीच नसल्याचे आता समोर आले. -दीप चव्हाण, नगरसेवक शासनाची मान्यता नसताना महापालिका कर आकारणी करत असून नागरिकांनी मंजुरी मिळेपर्यंत कर भरू नये. प्रशासनाकडून धूळफेक केली जात आहे. - किशोर डागवाले, सभापती, स्थायी समिती