शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

शीख, पंजाबी समाजाची बदनामी करणाऱ्यांवर कारवाई करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:28 IST

या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी कार्यालयात निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित यांना देण्यात आले. यावेळी हरजीतसिंग वधवा, प्रितपालसिंग धुप्पड, राजू मदान, ...

या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी कार्यालयात निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित यांना देण्यात आले. यावेळी हरजीतसिंग वधवा, प्रितपालसिंग धुप्पड, राजू मदान, चमनलाल कुमार, पुनीत भूतानी, राजा नारंग, रामसिंग कथुरिया, किरपाल सिंग, अमरजितसिंग वधवा, हरजिंदर सिंग, सुरेंद्रसिंग चावला, जस्मीत वधवा, सनी वधवा, अजितसिंग वधवा, संदीप आहुजा, ए. सी. कंत्रोड, हरविंदरसिंग नारंग, सरबजितसिंग अरोरा, बलजितसिंग बिलरा, हरवीरसिंग मक्कर, बॉबी सिंग आदी उपस्थित होते.

भारतातील शेतकरी मागील एक महिन्यापासून दिल्ली येथे कडाक्याच्या थंडीत आंदोलन करीत आहे. केंद्र सरकारने मंजूर केलेल्या तीन कृषी कायद्याच्या विरोधात हे आंदोलन सुरू असून, शेतकरी विरोधी असलेले कृषी कायदे रद्द करण्याची मागणीसाठी शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत. या आंदोलनात अनेक आंदोलक शेतकऱ्यांचा जीव गेला आहे. पूर्वी पंजाब आणि हरियाणाचे शेतकरी या आंदोलनात उतरले होते. सध्या महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू, आंध्रप्रदेश, तेलंगणा, मध्य प्रदेश, राजस्थान, उत्तराखंड आणि बिहार मधील शेतकरी आंदोलनात सहभागी होत आहेत. मात्र, समाजमाध्यमांवर शीख, पंजाबी समाजाला बदनाम करण्याचे षडयंत्र रचले गेले आहे. खलिस्तानवादीचा मुद्दा उपस्थित करुन आंदोलक शेतकऱ्यांना खलिस्तानवादीची उपमा दिली जात आहे. त्यामुळे समाज माध्यमांवर शीख, पंजाबी समाजाची बदनामी करणार्‍या समाजकंटकांवर कारवाई करण्याची मागणी शीख, पंजाबी समाजाच्या वतीने निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

----------

फोटो - २९शीख निवेदन

दिल्ली येथे मागील ३२ दिवसांपासून सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाचा प्रश्‍न केंद्र सरकारने तातडीने समन्वयाने सोडवावा, तसेच शेतकरी आंदोलनाच्या मुद्दयावरुन समाज माध्यमांवर शीख, पंजाबी समाजाची बदनामी करणार्‍या समाजकंटकांवर कारवाई करण्याची मागणीचे निवेदन शहरातील शीख, पंजाबी समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयात निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित यांना देण्यात आले.