भुरट्या चोऱ्या करणाऱ्या गुन्हेगारांवर कारवाई करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 04:27 IST2021-08-17T04:27:10+5:302021-08-17T04:27:10+5:30

अहमदनगर : शहरासह उपनगरांत भुरट्या चोऱ्या, घरफोड्या, चेन स्नॅचिंगच्या घटना घडत असून, गुन्हेगारांवर कारवाई करण्याचे आदेश संबंधितांना द्यावेत, अशी ...

Take action against criminals who commit burglary | भुरट्या चोऱ्या करणाऱ्या गुन्हेगारांवर कारवाई करा

भुरट्या चोऱ्या करणाऱ्या गुन्हेगारांवर कारवाई करा

अहमदनगर : शहरासह उपनगरांत भुरट्या चोऱ्या, घरफोड्या, चेन स्नॅचिंगच्या घटना घडत असून, गुन्हेगारांवर कारवाई करण्याचे आदेश संबंधितांना द्यावेत, अशी मागणी आमदार संग्राम जगताप यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्याकडे सोमवारी केली.

आमदार संग्राम जगताप यांच्यासह माजी नगरसेवक विजय गव्हाळे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांची भेट घेऊन निवेदन दिले. यावेळी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शहरासह मुख्य बाजारपेठेत, नागरी वसाहतीत, मोठ्या प्रमाणात घरफोड्या, भुरट्या चोऱ्या, वाहनचोरी, वर्दळीच्या ठिकाणी चेन स्नॅचिंगसारख्या घटना घडत आहेत. तसेच गुन्हे करणाऱ्यांवर कारवाई होत नसल्याने पोलिसांबाबत नाराजीची भावना आहे. शहरातील वाढत्या गुन्हेगारीबाबत वेळोवेळी पोलिसांशी संपर्क केला, परंतु, पोलिसांकडून कोणतीही कार्यवाही झाली नाही. गुन्हेगारांवर पोलिसांचा जरब राहिला नसल्याचे दिसून येत असून, याबाबत संबंधितांना आदेश द्यावेत, अशी मागणी जगताप यांनी केली आहे.

Web Title: Take action against criminals who commit burglary