शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

साखर आणखी भडकणार

By admin | Updated: September 14, 2016 23:23 IST

मिलिंदकुमार साळवे, अहमदनगर सरकारने विविध स्तरावर साखरेबाबत घातलेल्या मर्यादांमुळे साखर आणखीच महागणार आहे. कोणत्याही नियंत्रणामुळे बाजारपेठेतील वस्तू स्वस्त होत नाहीत.

मिलिंदकुमार साळवे, अहमदनगरसरकारने विविध स्तरावर साखरेबाबत घातलेल्या मर्यादांमुळे साखर आणखीच महागणार आहे. कोणत्याही नियंत्रणामुळे बाजारपेठेतील वस्तू स्वस्त होत नाहीत. उलट नियंत्रणामुळे महागाई वाढते. त्यामुळे राज्य व देशातील साखर कारखान्यांवर साखरेच्या साठ्यांबाबत घातलेल्या नियंत्रणामुळे साखर स्वस्त होणार नाही तर महागच होणार आहे. एकीकडे साखरेला जादा भाव मिळत असला तरी त्याचा फायदा शेतकऱ्याला मिळू दिला जात नाही, असे शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनी ‘लोकमत’शी संवाद साधताना सांगितले.गोवंश हत्या बंदी व बिफ बंदी विरोधी आंदोलनाच्या नियोजनासाठी येथे आले असता ‘लोकमत’शी बातचीत करताना म्हणाले, ‘गेल्या तीन वर्षांपासून शेतकऱ्यांच्या उसाला साडेनऊ टक्केच एफ. आर. पी. (किफायतशीर आधारभूत किंमत)प्रमाणे पेमेंट दिले जात आहे. पण तीन वर्षांमध्ये महागाईसोबत सरकारी सेवक व आमदार, खासदारांच्या पगारांमध्ये घसघशीत वाढ झाली आहे. पण उसाच्या भावात दरवाढ झाली नाही. २०१४-१५ ते १६-१७ या तीनही हंगामात एफ.आर.पी.मध्ये वाढ झाली नाही. ही बाब शेतकऱ्यांवर अन्याय करणारी आहे. याविषयी दोन्ही काँग्रेसवाले सरकारशी संगनमत करुन गप्प का आहेत? बाराशे रुपयांवरील साखरेचा भाव प्रति क्विंटल ३६०० रूपयांवर पोहोचला आहे. साखरेवरील मर्यादांमुळे भाववाढ आणखी होणार आहे. नियंत्रणामुळे स्वस्ताई होत न होता महागाई वाढते. उत्पादन वाढल्याशिवाय स्वस्ताई होत नाही. साखरेला सुरुवातीला ४५ रूपये प्रति पोते अनुदानाचा निर्णय झाला. नंतर तो रद्द केला. जागतिक भाववाढीने नंतर कर लावला. एकाच हंगामात तीन तीन निर्णय घेण्यात आले. नंतर त्यांचीही धरसोड झाली. घेतलेले निर्णय मागे घ्यावे लागले. साखरेला भाव मिळून व्यापाऱ्यांचा मोठ्या प्रमाणात आर्थिक फायदा होत असला तरी शेतकऱ्यांच्या पदरात चार पैसे जादा मिळू शकले नाहीत. साखरेला भाव मिळाला तरी शेतकऱ्याच्या उसाला भाव मिळू दिला जात नाही. शेतीमालास भाव मिळून शेतकऱ्यांच्या भल्यासाठी शेतीबाबत दीर्घ मुदतीचे धोरण आखण्याची गरज आहे. कृषी उत्पन्न बाजार समित्या आडतमुक्त व्हायलाच पाहिजेत. कृषी राज्यमंत्र्यांनी मुंबईच्या बाजारात बसून शेतकऱ्यांचा शेतमाल विकला. पण नंतर आडतमुक्तीचे काय झाले? हेच समजले नाही. आडत घेत नाही म्हणत काही समित्या अ‍ॅडव्हान्स घेत आहेत. शेतमाल आधारभूत किंमतीचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे. ’