शहरं
Join us  
Trending Stories
1
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
2
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
3
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
4
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
5
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
6
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
7
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
8
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
9
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
10
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
11
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
12
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
13
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
14
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
15
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
16
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
17
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
18
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
19
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
20
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
Daily Top 2Weekly Top 5

येळपणेत पोलीस पथकावर दगडफेक

By admin | Updated: August 21, 2014 23:05 IST

श्रीगोंदा : बेलवंडी पोलीस पथकावर ३५ जणांच्या जमावाने दगडफेक करण्याची घटना बुधवारी (दि़२०) दुपारी घडली़ या दगडफेकीतून पोलीस बालंबाल बचावले

श्रीगोंदा : तालुक्यातील येळपणे शिवारात रस्त्याचा वाद मिटविण्यासाठी गेलेल्या बेलवंडी पोलीस पथकावर ३५ जणांच्या जमावाने दगडफेक करण्याची घटना बुधवारी (दि़२०) दुपारी घडली़ या दगडफेकीतून पोलीस बालंबाल बचावले असून, याप्रकरणी आठ जणांना पोलिसांनी अटक केली़याबाबत पोलिसांकडून समजलेली माहिती अशी की, बंडू रामदास धावडे यांनी दिलेल्या तक्रारीवरुन रस्त्याचा वाद मिटविण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक शिवाजी काटे यांच्यासह पाच-सहा पोलीस येळपणेतील गट क्र. २३९ मध्ये गेले होते. रस्ता करण्याचे आदेश प्रशासनाचे आहेत, त्यामुळे रस्ता करण्यास आडवे येऊ नका, असे पोलिसांनी संदीप खामकर यांना सांगितले़ मात्र, खामकर रस्ता करु देत नसल्यामुळे पोलिसांनी खामकरला बेलवंडी पोलीस ठाण्यात आणण्यासाठी गाडीत बसविण्याचा प्रयत्न केला़ त्यामुळे चिडलेल्या संदीप खामकरसह कमल खामकर, प्रमिला खामकर, राजेंद्र खामकर, बाळासाहेब खामकर, वसंत खामकर, बापू खामकर, रामराव खामकर इतर २५-३० जणांच्या जमावाने पोलीस पथकावर दगडफेक करुन शिवीगाळ केली़ यासंदर्भात सहाय्यक फौजदार भाऊसाहेब संतु साबळे यांनी फिर्याद दिली. याप्रकरणी आठ आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.(प्रतिनिधी)