श्रीगोंदा : कोअर कमिटीच्या वतीने श्रीगोंदा तालुका शिक्षक संघाचे माजी अध्यक्ष रमजान हवालदार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निवेदन दिले.
नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी. कर्मचाऱ्यांच्या मागणीबरोबर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाची आर्थिक परिस्थिती नाही. भविष्यात या कर्मचाऱ्यांना न्याय देण्याबाबत सकारात्मक भूमिका घेऊ, असे आश्वासन अजित पवार यांनी केले. यासाठी नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बाबासाहेब भोस, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष घनश्याम शेलार, माजी आमदार राहुल जगताप, सतीश मखरे यांनी सहकार्य केले.
राज्य पेन्शन कोअर कमिटी कार्याध्यक्ष सुनील भोर, मुख्य समन्वयक देवीदास खेडकर, सतीश गांजुरे, राजेंद्र खेडकर, रवींद्र भोंडवे, राजेंद्र गारुडकर, मलंगशाह हवालदार, शरद पवार, प्रा. बंडू मखरे, सुभाष जामदार, ईश्वर रेवगे आदी उपस्थित होते.