शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात मद्यपींना ‘अच्छे दिन’

By admin | Updated: July 21, 2016 23:53 IST

पारनेर : सरकारचा निर्णय म्हणजे मद्यपींना ‘अच्छे दिन’ आल्याची स्थिती असल्याची टीका ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केली आहे.

पारनेर : राज्यातील मद्य परवानाधारक व्यक्तींना महिन्याला बारा मद्य बाटल्या बाळगू शके ल, हा सरकारचा निर्णय म्हणजे मद्यपींना ‘अच्छे दिन’ आल्याची स्थिती असल्याची टीका ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केली आहे. त्यांनी यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना पत्रही पाठविले आहे. संत-महंतांची व राजा शिवछत्रपतींच्या भूमीत राज्याचे निर्व्यसनी मुख्यमंत्री उपरोक्त निर्णय कसा घेऊ शकतील?, असा प्रश्नही अण्णांनी उपस्थित केला आहे. पारनेर तालुक्यातील लोणी मावळा, कर्जत तालुक्यातील कोपर्डी येथील अत्याचाराच्या घटना दारूमुळेच झाल्याची अण्णांनी आठवण करून दिली.अण्णांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून मद्य परवान्याच्या निर्णयाचा समाचार घेतला आहे. अण्णा हजारे यांची १२ जानेवारी २००९ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री व सहा मंत्र्यांसोबत एकत्रित बैठक झाली होती. त्याचवेळी त्यांनी दारू बाटल्या बाळगण्यात वाढ देण्यास विरोध केला होता. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आरोग्यास मद्य अपायकारक असल्याचेही आपण सांगितले होते. त्यावेळी महिन्याला फक्त दोन बाटल्या बाळगण्याचा निर्णय घेण्यात आला होता. दारूमुळे शासनाला २३ हजार कोटी रूपयांचे उत्पन्न मिळते. त्यामुळे राज्य उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांना उत्पन्न वाढविण्यासाठी लक्ष्य ठरवून दिले जात आहे. ही पुरोगामी महाराष्ट्राला शोभणारी बाब नाही. संतांची भूमी असलेल्या व युवकांची प्रेरणा असणाऱ्या राजा छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात हे धोरण कितपत योग्य आहे, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे. व्यसनांमुळे राज्याची कायदा व सुव्यवस्था ढासळत चालली असताना विकास कामांना खीळ बसत आहे. सरकारच्या निर्णयामुळे घरोघरी परमीट रूम तयार होतील, अशी भीती अण्णांनी व्यक्त केली आहे. लहान मुलेही व्यसनाच्या आहारी जातील. कोपर्डीसारख्या घटना वाढत्या व्यसनाधिनतेमुळे घडत आहेत. (तालुका प्रतिनिधी)