शहरं
Join us  
Trending Stories
1
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
2
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
3
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
4
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
5
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
6
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
7
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
8
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
9
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
10
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
11
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
12
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
13
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
14
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
15
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
16
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
17
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
18
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
19
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
20
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्याचे रखडलेले काम तत्काळ सुरू करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 04:21 IST

कोपरगाव : शहरातील उपनगरांना जोडणाऱ्या बैलबाजार रस्ताचे काम गेल्या वर्षभरापासून रखडले आहे. त्यामुळे कोपरगाव नगर परिषदेने ते तत्काळ पूर्ण ...

कोपरगाव : शहरातील उपनगरांना जोडणाऱ्या बैलबाजार रस्ताचे काम गेल्या वर्षभरापासून रखडले आहे. त्यामुळे कोपरगाव नगर परिषदेने ते तत्काळ पूर्ण करावे. अन्यथा १ मे ला नगर परिषद कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष नवाज कुरेशी यांनी मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांना बुधवारी (दि. ७) दिलेल्या निवेदनातून दिला आहे.

कुरेशी म्हणाले, या रस्त्याचा प्रामुख्याने निवारा, खडकी, सुभद्रानगर, ओमनगर, गवारेनगर, शंकरनगर व इतर उपनगरातील नागरिक वापर करतात. हा त्यांच्यासाठी सोयीचा मार्ग आहे. या रस्त्याचे काम जवळपास एक वर्षापासून बंद पडलेले आहे. काम सुरू करावे यासाठी नगरपालिकेला १७ डिसेंबरला निवेदन दिले होते. त्यानंतर वारंवार तक्रार करूनही काहीच उपयोग झाला नाही. संबंधित ठेकेदारालाही काम सुरू करण्यासंदर्भात वारंवार सूचना केली. परंतु, त्यांच्याकडून काहीच प्रतिसाद मिळत नाही. या रखडलेल्या रस्त्याच्या मध्यभागी असलेल्या मोठमोठ्या कपारी आणि पडलेल्या खड्ड्यांमुळे तसेच स्पीडब्रेकर नसल्याने सतत अपघात घडत आहेत.