शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलच्या एका निर्णयाने नव्या वादाला तोंड फुटले, १६ मुस्लिम देश संतापले; दिला मोठा इशारा!
2
"थोडीही चुक केली तरी संपूर्ण ताकदीनं उत्तर देऊ..."; इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा
3
अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करताय? आधी 'या' महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या, तुमचाच होईल फायदा...
4
PM मोदींचे भाषण अन् कारमधला फोटो... 'युवा आमदार' मैथिली ठाकूर होतेय ट्रोल, कारण...
5
१२ कोचची नॉन-AC ट्रेन, आजपर्यंत मिळाल्या नाहीत अशा १० सेवा मिळणार; प्रवाशांना मोठा फायदा!
6
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
7
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
8
"माझ्यामध्ये दैवीशक्ती आहे, कॅन्सरसारखे आजारही बरे करतो", संगमनेरमधील भोंदूबाबा गजाआड
9
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
10
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
11
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
12
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
13
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
14
PM Modi: विरोधकांची महिलाविरोधी कट्टर मानसिकता जनतेसमोर उघड करा: पंतप्रधान मोदी
15
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
16
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
17
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
18
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
19
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
20
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
Daily Top 2Weekly Top 5

चाकूहल्ल्यात तरूणाचा खून

By admin | Updated: August 21, 2014 23:06 IST

संगमनेर : एकतर्फी प्रेमसंबंधामुळे समजावून सांगणाऱ्या सुरज कैलास जाधव (वय २२) या तरूणाचा धारधार चाकूने भोसकून खून केल्याची घटना गुरूवारी रात्री ९ वाजता शहरात घडली.

संगमनेर : एकतर्फी प्रेमसंबंधामुळे समजावून सांगणाऱ्या सुरज कैलास जाधव (वय २२) या तरूणाचा धारधार चाकूने भोसकून खून केल्याची घटना गुरूवारी रात्री ९ वाजता शहरात घडली. याप्रकरणी शहर पोलिसांनी ७ जणांविरूध्द खुनाचा गुन्हा दाखल केला असून ६ आरोपींना अकोले व संगमनेरमध्ये अटक करण्यात आले. पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, राजापूर रोडवर ढोलेवाडी परिसरात राहणाऱ्या मयत सूरज जाधव याच्या बहिणीची काही दिवसांपूर्वी छेड काढल्याने भांडण झाले होते. गुरूवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास सूरज जाधव हा मित्र निलेश रमेश ढोले व योगेश रमेश ढोले यांच्यासमवेत घरी जात असताना अकोले बायपासवरील पेटीट हायस्कूलसमोर विनायक गणपत भोर, सागर शंकर ढोले, मुकूंदा भरत ढोले, प्रसाद भारत ढोले, ज्ञानेश्वर मच्छिंद्र ढोले, वैभव गोरख ढोले व राजेंद्र जंबूकर (सर्व रा. ढोलेवाडी) यांनी त्यांना अडविले. दरम्यान एकतर्फी प्रेमसंबंधातून सूरज हा ज्ञानेश्वर ढोले यास समजावून सांगण्याचा प्रयत्न करीत असताना आरोपींनी संगनमताने सुरज, निलेश व योगेश यांना शिवीगाळ व दमदाटी करून लाथा-बुक्याने मारहाण करीत सशस्त्र हल्ला केला. यातील आरोपी विनायक भोर याने हातातील धारधार चाकूने सुरज जाधव याच्या छातीवर सपासप वार केले. या हल्यात सूरजसह निलेश, योगेश व सागर ढोले असे चौघे गंभीर जखमी झाले. घटनेनंतर सर्व आरोपी पळून गेले. जखमींवर एका खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करून प्रकृती चिंताजनक असल्याने सूरज यास नाशिकला हलविण्यात आले. परंतू प्रचंड रक्तस्त्राव झाल्याने सूरजचा मृत्यू झाला.याप्रकरणी निलेश ढोले याने दिलेल्या फिर्यादीवरून शहर पोलिसांनी वरील ७ आरोपींविरूध्द खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक श्याम सोमवंशी अधिक तपास करीत असून ५ आरोपींना पहाटे अकोले व संगमनेर येथून अटक करण्यात आली आहे. (प्रतिनिधी) ‘सूरज’चे वडील काही दिवसांपूर्वी मयत झाले असून त्याला एक बहीण व लहान भाऊ आहे. तो औद्योगिक प्रशिक्षण केंद्रात शिक्षण घेवून वेल्डींगची कामे करून कुटूंबाचा उदरनिर्वाह करीत होता. मयत ‘सूरज’चा मृतदेह नाशिकहून थेट शहर पोलिस ठाण्यात नेण्यात आला. सूरजच्या मारेकऱ्यांना अटक न केल्यास अंत्यसंस्कार न करण्याचा पवित्रा नातेवाईकांनी घेतल्याने तणाव निर्माण झाला. पोलिस निरीक्षक श्याम सोमवंशी यांनी आरोपींना अटक करण्याचे आश्वासन दिल्यानंतर मृतदेह हलविण्यात आला.