लोकमत भवनमधील रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:16 IST2021-07-18T04:16:12+5:302021-07-18T04:16:12+5:30

जिल्ह्यात दि. २ जुलैपासून रक्तदान शिबिर सुरू आहे. प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी, तसेच काही गावांमध्ये झालेल्या शिबिरांच्या माध्यमातून नागरिकांनी महारक्तदान ...

Spontaneous response to blood donation camp at Lokmat Bhavan | लोकमत भवनमधील रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

लोकमत भवनमधील रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

जिल्ह्यात दि. २ जुलैपासून रक्तदान शिबिर सुरू आहे. प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी, तसेच काही गावांमध्ये झालेल्या शिबिरांच्या माध्यमातून नागरिकांनी महारक्तदान अभियानात सहभाग घेतला. शनिवारी नगर येथील लोकमत भवनमध्ये जनकल्याण रक्तपेढीच्या सहकार्याने रक्त संकलन करण्यात आले. स्व. जवाहरलालजी दर्डा ऊर्फ बाबूजी यांच्या प्रतिमेला अभिवादन करून व दीपप्रज्वलन करून या रक्तदान शिबिराला प्रारंभ झाला. दिवसभरात ८१ जणांनी रक्तदान केले. या सर्वांना लोकमत आणि जनकल्याण रक्तपेढीतर्फे प्रमाणपत्र देण्यात आले, तसेच गुरू सुपर मार्केटतर्फे गुळाची भेट देण्यात आली.

-------------

सोशल मीडियावर फोटो झळकले

लोकमत भवनमध्ये रक्तदान केल्यानंतर रक्तदान करतानाचे, तसेच प्रमाणपत्र प्रदान करताना अनेकांनी छायाचित्र काढले. हे छायाचित्र अनेकांनी सोशल मीडियावर व्हायरल केले. यातूनही रक्तदात्यांनी सर्वांना रक्तदान करण्याचे आवाहन केले.

-----------

यांनी केले रक्तदान

सुधीर लंके, साहेबराव नरसाळे, चंद्रकांत शेळके, नवनाथ खराडे, प्रकाश निक्रड, तुषार वांढेकर, रामा महानोर, रवींद्र कुतवळ, ओंकार फोलाने, अक्षय गाडेकर, कृष्णा गुंड, प्रतीक व्यवहारे, कौशल दिवेकर, तिरमलेश पासकंटी, संतोष कानडे, आदित्य गोरे, अरुण बनसोडे, संतोष रंधवे, सचिन चुबंळकर, प्रशांत चांदगुडे, लहू लोणकर, चंद्रकांत माळी, भैरवनाथ वाकळे, तुषार सोनवणे, प्रा. महेबूब सय्यद, दीपक शिरसाठ, विशाल कुंभार, गणेश साठे, बापू केदार, ऋषिकेश वाघ, भाऊसाहेब काळोखे, अमोल जाधव, राजेश तनपुरे, श्रेयस लिमये, रमेश तनपुरे, विकास मेहेत्रे, रवीकुमार राठोड, शुभम बंब, प्रशांत खिलारी, फिरोज शेख, ऋत्विक बर्डे, सोमनाथ साबळे, मच्छिंद्र दुधवडे, अक्षय कांबळे, नरेंद्रस्वामी डापसे, अजित केकाण, आकाश साळवे, राहुल भिंगारदिवे, विपुल शिंदे, परशुराम भोसले, दीपक वाळुंजकर, लुकस क्षेत्रे, अर्चना काळे, बाळासाहेब किर्तने, सुशांत सावरीकर, दिलीप सांगळे, उद्धव काळापहाड, संतोष दरवडे, प्रशांत वाघमारे, सागर भंडारी, सुधीर पुंड, दिनेश साठे, जयंत येलूलकर, सोमनाथ गाहिले, वैभव घोरपडे, शुभम धनगर, नयन बोरुडे, रोहिदास शिंदे, नागेशचंद्र आढाव, कचरू शिंदे, आदित्य आढाव, सोमेश साठे, प्रा. अंकुश आवारे, नवनाथ मुरकुटे, सचिन गणवले, भाऊसाहेब नगरे, गौरव कंत्रोड, स्वराज मोरे, बाबासाहेब सोलकर, ज्ञानेश्वर आजबे, गणेश नारायणे.

-------------

फोटो-

स्व. जवाहरलालजी दर्डा ऊर्फ बाबूजी यांच्या प्रतिमेला अभिवादन व दीपप्रज्वलन करून शनिवारी लोकमत भवनमधील रक्तदान शिबिराचे उद्‌घाटन झाले.

Web Title: Spontaneous response to blood donation camp at Lokmat Bhavan