विसपुते चांदी दालनात चांदी महोत्सवाला सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 04:27 IST2021-08-17T04:27:03+5:302021-08-17T04:27:03+5:30

कोपरगाव : तालुक्यातील प्रसिद्ध सराफी पेढी विसपुते सराफांच्या चांदी दालनाच्या तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त सोमवार १६ ऑगस्टपासून चांदी महोत्सवाचे आयोजन ...

Silver Festival begins at Vispute Silver Hall | विसपुते चांदी दालनात चांदी महोत्सवाला सुरुवात

विसपुते चांदी दालनात चांदी महोत्सवाला सुरुवात

कोपरगाव : तालुक्यातील प्रसिद्ध सराफी पेढी विसपुते सराफांच्या चांदी दालनाच्या तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त सोमवार १६ ऑगस्टपासून चांदी महोत्सवाचे आयोजन केले आहे. त्यानिमिताने या महोत्सवात चांदीच्या मजुरीत २५ ते ५० टक्क्यापर्यंत सूट मिळणार असल्याची माहिती पेढीचे संचालक दीपक विसपुते यांनी दिली.

विसपुते म्हणाले, जवळपास पाच वर्षांपूर्वी सोन्याचे प्रशस्त दालन आणि त्यानंतर अवघ्या दोन वर्षात चांदीचे स्वतंत्र दालन सुरु करून विसपुते सराफी पेढीने संपूर्ण तालुक्याचे लक्ष वेधून घेतले. या चांदी दालनात चांदीचे दागिने, पूजेची सर्व उपकरणे, चांदीची भांडी, देवदेवतांच्या मूर्ती, देवाचे टाक, बाळ लेणी याबरोबरच भातुकलीपासून ते डिनरसेट, आकर्षक भेटवस्तू असे चांदीमध्ये ' सबकुछ ' उपलब्ध असल्याने पंचक्रोशीतील ग्राहकांची पहिली पसंती या सराफी पेढीला असते. पेढीच्या वतीने सातत्याने राबविल्या जाणाऱ्या विविध योजना, उपक्रम याविषयी ग्राहकांना उत्सुकता असते. आपले हेच वैशिष्ट्य कायम ठेवत यंदा विसपुते चांदी दालनाच्या तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित केलेला चांदी महोत्सव १६ ऑगस्टपासून सुरु झाला आहे. पायल, जोडवी, बिछवे, छल्ला, कंबरपट्टा, कानातले, अंगठ्या अशा चांदीच्या दागिन्यांची मोठी व्हरायटी या महोत्सवात पहायला मिळणार आहे. आपल्याकडची जुनी चांदी देऊन नवी चांदीची वस्तू ग्राहकांना खरेदी करता येणार आहे.

यश विसपुते म्हणाले, सणावाराला आता नुकतीच सुरुवात झाली आहे. त्यामुळे चांदीच्या छोट्या-मोठ्या वस्तू, दागिने, भेटवस्तू याला या काळात चांगली मागणी असते. याच उद्देशाने या महोत्सवाचे आयोजन केले आहे. आकर्षक व्हरायटी, पारदर्शी व्यवहार, उत्तम सोयीसुविधा आणि तत्पर सेवा याची जोड मिळाल्याने ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद मिळतो तसाच तो याही चांदी महोत्सवाला मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

(वा.प्र.)

Web Title: Silver Festival begins at Vispute Silver Hall