शहरं
Join us  
Trending Stories
1
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
2
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
5
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
7
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
8
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
9
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
10
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
11
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
12
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
13
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
14
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
15
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
16
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
17
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
18
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
19
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
20
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

विसपुते चांदी दालनात चांदी महोत्सवाला सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:26 IST

कोपरगाव : तालुक्यातील प्रसिद्ध सराफी पेढी विसपुते सराफांच्या चांदी दालनाच्या तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त सोमवार १६ ऑगस्टपासून चांदी महोत्सवाचे आयोजन ...

कोपरगाव : तालुक्यातील प्रसिद्ध सराफी पेढी विसपुते सराफांच्या चांदी दालनाच्या तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त सोमवार १६ ऑगस्टपासून चांदी महोत्सवाचे आयोजन केले आहे. त्यानिमिताने या महोत्सवात चांदीच्या मजुरीत २५ ते ५० टक्क्यापर्यंत सूट मिळणार असल्याची माहिती पेढीचे संचालक दीपक विसपुते यांनी दिली.

विसपुते म्हणाले, जवळपास पाच वर्षांपूर्वी सोन्याचे प्रशस्त दालन आणि त्यानंतर अवघ्या दोन वर्षात चांदीचे स्वतंत्र दालन सुरु करून विसपुते सराफी पेढीने संपूर्ण तालुक्याचे लक्ष वेधून घेतले. या चांदी दालनात चांदीचे दागिने, पूजेची सर्व उपकरणे, चांदीची भांडी, देवदेवतांच्या मूर्ती, देवाचे टाक, बाळ लेणी याबरोबरच भातुकलीपासून ते डिनरसेट, आकर्षक भेटवस्तू असे चांदीमध्ये '''' सबकुछ '''' उपलब्ध असल्याने पंचक्रोशीतील ग्राहकांची पहिली पसंती या सराफी पेढीला असते. पेढीच्या वतीने सातत्याने राबविल्या जाणाऱ्या विविध योजना, उपक्रम याविषयी ग्राहकांना उत्सुकता असते. आपले हेच वैशिष्ट्य कायम ठेवत यंदा विसपुते चांदी दालनाच्या तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित केलेला चांदी महोत्सव १६ ऑगस्टपासून सुरु झाला आहे. पायल, जोडवी, बिछवे, छल्ला, कंबरपट्टा, कानातले, अंगठ्या अशा चांदीच्या दागिन्यांची मोठी व्हरायटी या महोत्सवात पहायला मिळणार आहे. आपल्याकडची जुनी चांदी देऊन नवी चांदीची वस्तू ग्राहकांना खरेदी करता येणार आहे.

यश विसपुते म्हणाले, सणावाराला आता नुकतीच सुरुवात झाली आहे. त्यामुळे चांदीच्या छोट्या-मोठ्या वस्तू, दागिने, भेटवस्तू याला या काळात चांगली मागणी असते. याच उद्देशाने या महोत्सवाचे आयोजन केले आहे. आकर्षक व्हरायटी, पारदर्शी व्यवहार, उत्तम सोयीसुविधा आणि तत्पर सेवा याची जोड मिळाल्याने ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद मिळतो तसाच तो याही चांदी महोत्सवाला मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

(वा.प्र.)