शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: पेपर फुटला, नीट २०२६ ची परीक्षा रद्द, सीबीआय चौकशीचे आदेश
2
Top Marathi News LIVE Updates: मुख्यमंत्री विजय यांच्या सरकारला मोठं 'बळ', बहुमत चाचणीआधी तामिळनाडूत मोठी घडामोड
3
पुण्याच्या स्वप्नालीने वडिलांना व्हिडीओ कॉल केला अन्...; मुंबईतील वरळीमध्ये घडली हादरवून टाकणारी घटना
4
'I Love You'ला टाकलं मागे! गुगल ट्रान्सलेटवर २० वर्षांत 'या' शब्दाचा झाला सर्वाधिक वापर
5
शेअर असावा तर असा! 'ही' कंपनी गुंतवणूकदारांना प्रत्येक स्टॉकवर देणार ₹६५६ चा लाभांश, रेकॉर्ड डेट कधी?
6
मध्य रेल्वेच्या ८४८ मोटरमनवर कामाच्या ओझ्यापेक्षा नियमांचाच अधिक ताण; कर्मचारी उच्च रक्तदाब, मूत्रपिंडाच्या व्याधींनी त्रस्त
7
'पंतप्रधानांच्या घोषणेने देशात अस्वस्थता, सर्वपक्षीय बैठक तातडीने बोलवा'; शरद पवारांची प्रतिक्रिया
8
पाकिस्तानचा डबल गेम! अमेरिकेच्या हल्ल्यापासून वाचवण्यासाठी इराणच्या विमानांना दिला आश्रय
9
Naivedya Ritual:देवाला नैवेद्य अर्पण करताना तुळशीपत्र का ठेवतात? तंत्रसार ग्रंथात मिळते 'हे' उत्तर!
10
कोयता सोडून धरली औषधपेटी! ऊसतोड महिला आता फडावरच्या ‘डॉक्टर मॅडम’; बीड पॅटर्नचा राज्याला आदर्श 
11
Tamil Nadu Politics: अण्णा द्रमुकमध्ये फूट, षण्मुगम गटाने TVK ला दिला पाठिंबा, तामिळनाडूत मोठी उलथापालथ
12
हळदीत आनंदाने नाचले अन् मुलीची पाठवणी करण्याआधीच बापाचा मृत्यू; पालघरमधील ह्रदयद्रावक घटना
13
"अल्लू अर्जुनची प्रॉपर्टी...", अभिनेत्रीच्या 'त्या' फोटोवर युजरची घाणेरडी कमेंट, दिलं सडेतोड उत्तर
14
PM Modi: पंतप्रधानांच्या आवाहनाचा होतोय परिणाम, 'हे' टेक दिग्गज Work From Home लागू करण्याच्या तयारीत
15
Nashik TCS Case : "सामाजिक दबाव, बदनामीची भीती..."; TCS प्रकरणात महिला आयोगाच्या अहवालात धक्कादायक खुलासे
16
जमिनीच्या व्यवहारासाठी  ले-आउट मंजुरी गरजेची, अन्यथा गुन्हा दाखल होणार; महसूलमंत्री बावनकुळेंचा इशारा
17
ड्रॅगनची अमेरिकेत घुसखोरी! माजी महापौरांनीच दिला देशाला धोका, चिनी एजंट असल्याचं केलं कबूल
18
‘चुका तुमच्या आणि त्याचा भुर्दंड जनतेला का ?’ राज ठाकरेंचं पत्र, केंद्र सरकारला प्रश्न
19
जगात युद्धाचा भडका, अन् चीनची गुपचूप 'धान्य साठेबाजी'; भारतासाठी धोक्याची घंटा?
20
Adhik Maas 2026: अधिक मासात अधिक पुण्यप्राप्तीसाठी 'या' दोन गोष्टी महिनाभर करण्याचा करा संकल्प!
Daily Top 2Weekly Top 5

विरोधी पक्षनेते पदासाठी कोतकरांकडून सह्यांची मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 04:16 IST

अहमदनगर : महापालिकेतील विरोधी पक्षनेते पदासाठी भाजपमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू झाली आहे. माजी महापौर बाबासाहेब वाकळे हे विरोधी पक्षनेतेपदासाठी ...

अहमदनगर : महापालिकेतील विरोधी पक्षनेते पदासाठी भाजपमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू झाली आहे. माजी महापौर बाबासाहेब वाकळे हे विरोधी पक्षनेतेपदासाठी इच्छुक आहेत. त्यांनी नगरसेवकांच्या पाठिंब्याचे पत्र महापौरांकडे मंगळवारी सुपुर्द केले. त्यांच्यापाठोपाठ भाजपचे नगरसेवक मनोज कोतकर यांनी बुधवारी पाठिंब्यासाठी नगरसेवकांच्या सह्यांची मोहीम हाती घेतली असून, शहर जिल्हाध्यक्ष महेंद्र गंधे यांचे वरिष्ठांकडे प्रयत्न सुरू असल्याचे समजते.

विरोधी पक्षनेतेपदी नियुक्ती केल्याचे पत्र महापौरांनी भाजपचे नगरसेवक तथा माजी महापौर बाबासाहेब वाकळे यांना दिले होते. परंतु, भाजपच्या प्रदेशध्यक्षांनीच ही नियुक्ती थांबविण्याचा आदेश दिला. याबाबत निर्णय घेण्यासाठी प्रदेशाध्यक्षांनी शुक्रवारी (दि. १६) नगरसेवक व पदाधिकाऱ्यांची बैठक बोलविली आहे. विरोधी पक्षनेते पदासाठी माजी महापौर बाबासाहेब वाकळे, नगरसेवक महेंद्र गंधे, माजी स्थायी समिती सभापती मनोज कोतकर, गटनेत्या मालन ढोणे हे चोघे इच्छुक आहेत. गटनेत्या ढोणे यांनी प्रदेशध्यक्षांकडून नाव सुचविल्यानंतरच विरोधी पक्षनेत्यांची नियुक्ती करावी, अशा आशयाचे पत्र महापौरांना सोमवारी दिले आहे. त्यानंतर मंगळवारी वाकळे यांनी नगरसेवकांच्या पाठिंब्याचे पत्र महापौरांकडे सुपुर्द केले. वाकळे यांचे सेनेबरोबरच राष्ट्रवादीशी सलोख्याचे संबंध आहेत. त्यामुळे महापौरांनी वाकळे यांना विरोधी पक्षनेते पदाचे पत्र दिल्याचे वृत्त आहे. मनपातील या नाट्यमय घडामोडींमुळे भाजपमधील इच्छुकही सावध झाले. त्यांनी पक्षाकडे इच्छा व्यक्त करत जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. माजी सभापती मनोज कोतकर यांनी बुधवारी पाठिंब्यासाठी नगरसेवकांच्या सह्यांची मोहीम राबविली. अन्य नगरसेवकांशीही ते संपर्क करत आहेत. कोतकर हे राष्ट्रवादीकडून सभापती झाले होते. अवघ्या चार महिन्यांतच त्यांचे पद संपुष्टात आले. त्यासाठी माजी महापौर वाकळे यांनी स्थायी सदस्यांच्या निवडीसाठी सभा घेण्याची तत्परता दाखविली. तेव्हापासून कोतकर व वाकळे यांच्यात सुप्त संघर्ष आहे. तो विरोधी पक्षनेत्यांची नियुक्ती करताना आणखी तीव्र झाला आहे.

....

महिला बालकल्याण समिती काँग्रेसला

महापालिकेत सेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसची सत्ता आहे. शिवसेनेकडे महापौरपद व राष्ट्रवादीकडे उपमहापौरपद आहे. काँग्रेसला महिला बालकल्याण समिती देण्याबाबत आघाडीत एकमत झाले आहे. या पदासाठी काँग्रेसकडून रूपाली निखिल वारे व संध्या बाळासाहेब पवार यांच्या नावाची चर्चा आहे.

....

प्रदेशाचा निर्णय अंतिम

विरोधी पक्षनेतेपदासाठी भाजपमधून काहींनी इच्छा व्यक्त केलेली आहे. पदासाठी इच्छा व्यक्त करणे काही गैर नाही. परंतु, पक्षाचा निर्णय अंतिम असतो. भाजपच्या प्रदेशाध्यक्षांनी याबाबत बैठक बोलावली असून, पक्षाकडून जे नाव सुचविलेले जाईल. त्यांच्या नावाची शिफारस गटनेत्यांमार्फत केली जाईल, अशी माहिती भाजपचे माजी आमदार शिवाजी कर्डिले यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

...