श्रीरामपूर काँग्रेसची प्रभागवार लसीकरण नाव नोंदणी मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 04:15 IST2021-06-03T04:15:41+5:302021-06-03T04:15:41+5:30

शहरातील प्रभाग ६, ८, १४ व १५ मध्ये ही नोंदणी पूर्ण झाली असून आतापर्यंत दोन हजार ६८३ नागरिकांनी या ...

Shrirampur Congress Ward wise Vaccination Name Registration Campaign | श्रीरामपूर काँग्रेसची प्रभागवार लसीकरण नाव नोंदणी मोहीम

श्रीरामपूर काँग्रेसची प्रभागवार लसीकरण नाव नोंदणी मोहीम

शहरातील प्रभाग ६, ८, १४ व १५ मध्ये ही नोंदणी पूर्ण झाली असून आतापर्यंत दोन हजार ६८३ नागरिकांनी या मोहिमेतून नावनोंदणी केली आहे. या नोंदणी अभियानास चांगला प्रतिसाद मिळत आहे. अभियान सलग १५ दिवस सुरू राहणार आहे. हे अभियान प्रत्येक प्रभागात राबवले जाणार असून कोणीही लसीकरणापासून वंचित राहू नये यासाठी जास्तीत जास्त लोकांनी नाव नोंदणी करण्याचे आवाहन करण ससाणे यांनी केले आहे.

अभियान राबविण्यासाठी उपनगराध्यक्ष ससाणे, जिल्हा काँग्रेसचे कार्याध्यक्ष सचिन गुजर, काँग्रेसचे शहराध्यक्ष संजय छल्लारे, श्रीनिवास बिहाणी, शशांक रासकर, माजी नगरसेवक आशिष धनवटे, रितेश रोटे, किरण परदेशी यांनी पुढाकार घेतला आहे.

नागरिकांमध्ये लसीकरणाबद्दल जागृती होऊन मोठ्या संख्येने नोंदणी होत आहे. या अभियानाप्रसंगी सॅनिटायझर, सोशल डिस्टन्सिंग, मास्कचा वापर केला जात आहे. त्यामुळे नागरिक समाधानी आहेत. प्रभागावर नियोजन केल्यामुळे या उपक्रमाचे सर्व थरातून स्वागत होत आहे अशी माहिती ससाणे यांनी दिली.

---

Web Title: Shrirampur Congress Ward wise Vaccination Name Registration Campaign