श्रीगोंदा बाजार समिती संचालकाच्या मुलाची गोळी झाडून आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2021 11:21 IST2021-01-02T11:20:36+5:302021-01-02T11:21:55+5:30
Dadasaheb Nalge Suicide : आत्महत्यामागचं कारण मात्र समजू शकलेलं नाही.

श्रीगोंदा बाजार समिती संचालकाच्या मुलाची गोळी झाडून आत्महत्या
श्रीगोंदा - श्रीगोंदा बाजार समितीचे संचालक लक्ष्मणराव नलगे यांचे चिरंजीव दादासाहेब नलगे (वय 35) याने स्वत:च्या रिव्हॉल्व्हरने गोळी झाडून आत्महत्या केली आहे. शनिवारी पहाटे दौड येथील राहत्या घरी ही घटना घडली. आत्महत्यामागचं कारण मात्र समजू शकलेलं नाही.
लक्ष्मणराव नलगे यांना सुधीर व दादासाहेब ही दोन मुले त्यापैकी दादासाहेब हा दौड येथील व्यवहार पाहत होता. त्याच्याकडे परवानाधारक रिव्हॉल्व्हर होता. दादासाहेब गेल्या एक महिन्यापासून तणावाखाली होता. का तणावाखाली होता याचे कारण समजू शकले नाही मात्र याच तणावातून दादासाहेबने आत्महत्या केली असावी असा संशय व्यक्त केला आहे. दादासाहेब याने काही दिवसांपुर्वी लग्नाचा वाढदिवस साजरा केला होता. सोशल मीडीयावर फोटो टाकले. त्यानंतर ही दुर्दैवी घटना घडली आहे. त्याच्या मागे आई-वडील, पत्नी आणि एक मुलगा आहे.