शहरं
Join us  
Trending Stories
1
Government Employees Strike: सरकारी कर्मचारी, शिक्षक आजपासून बेमुदत संपावर, त्यांच्या मागण्या काय आहेत? 
2
Jammu Ramnagar Bus Accident: चालकाचे नियंत्रण सुटलं, बस डोंगरावरून १०० मीटर खोल दरीत कोसळली, २१ जण ठार
3
Donald Trump: शांतता करार आजच होणार; इराणचे शिष्टमंडळही पोहोचणार, डोनाल्ड ट्रम्प काय म्हणाले?
4
ट्रम्प यांचा इराणला थेट इशारा! 'युद्धविराम संपला तर एवढे बॉम्ब पडतील की...', इस्लामाबाद चर्चेआधी तणाव वाढला!
5
...तर इराणवर पुन्हा ड्रोन-क्षेपणास्त्रांचा वर्षाव? "मोहीम अद्याप संपलेली नाही"; व्हाइट हाऊसनंतर आता नेतन्याहू यांचाही थेट इशारा
6
GT vs MI : हा माझा प्रॉब्लेम नाही! तिलक-बुमराहसंदर्भातील कळीच्या मुद्यावर पांड्या स्पष्टच बोलला
7
औराद शहाजानी परिसरात उष्माघाताने शेतकऱ्याचा मृत्यू; साेमवारी तापमान पाेहोचले ४२.८ अंशावर
8
IPL 2026 : "घासून नाही, ठासून हरवलं "! MI चं विक्रमी विजयासह दमदार कमबॅक; GT ला पहिल्यांदाच दिली मात
9
'लिव्ह इन पार्टनर'च्या छळाला कंटाळून ५१ वर्षीय महिलेकडून आत्महत्येचा प्रयत्न, मृत्यू झाल्यावर गुन्हा दाखल
10
रणजी क्रिकेटमध्ये संधी देण्याच्या नावाखाली दोन तरुणांना २० लाखांचा गंडा
11
कार्यकर्ता अपमानित होतो, तेव्हा माझ्यातील शिवसैनिक जागा : एकनाथ शिंदे
12
९३ दिवसांचा थरार अन् 'ऑपरेशन महादेव' फत्ते! पहलगामच्या मारेकऱ्यांचा असा घेतला भारतीय सैन्याने बदला!
13
मध्यपूर्वेतील राजकारणात मोठा भूकंप; "आता अमेरिकेची गरज नाही...!" UAE चा ट्रम्प यांना तगडा धक्का, नवा वाद पेटला
14
श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीला ७ हजार आंब्यांचा महानैवेद्य; अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर ट्रस्टकडून आंबा महोत्सव 
15
Tilak Varma Maiden IPL Hundred : तिलक वर्माची अविश्वसनीय सेंच्युरी; MI साठी ठरला खरा संकटमोचक!
16
Travel : भारतात आहे चक्क मंगळ ग्रहासारखी जागा! पर्यटकांची पहिली पसंती; 'हे' अजब ठिकाण पाहिलेत का?
17
साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची बदली; एकूण ९ अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश निघाले... 
18
GT vs MI : स्टंप तोड गोलंदाजी! षटकारासह स्वागत झाल्यावर रबाडानं असा घेतला सूर्या दादाचा बदला (VIDEO)
19
पतीच्या मैत्रिणीस अडकवण्यासाठी चाकुरात पत्नीने केला पुतण्याचा खून; 'असा' झाला उलगडा
20
सराफवाडी येथे माय लेकाची गळफास घेवून आत्महत्या; कारण अस्पष्ट, वालचंदनगर पोलिसांकडून तपास सुरू 
Daily Top 2Weekly Top 5

श्रावण सोहळ्यात सखींची धमाल

By admin | Updated: August 24, 2014 02:05 IST

अहमदनगर : ‘लोकमत सखी मंच’ आयोजित साईदीप ग्रुप प्रस्तुत व गिफ्ट स्पॉन्सरस एस.जी. कायगावकर ज्वेलर्स यांच्या सहकार्याने ‘‘श्रावण सोहळा’’ लक्ष्मीनारायण मंगल कार्यालय येथे पार पडला.

अहमदनगर : ‘लोकमत सखी मंच’ आयोजित साईदीप ग्रुप प्रस्तुत व गिफ्ट स्पॉन्सरस एस.जी. कायगावकर ज्वेलर्स यांच्या सहकार्याने ‘‘श्रावण सोहळा’’ लक्ष्मीनारायण मंगल कार्यालय येथे पार पडला. यावेळी आयोजित उखाणा स्पर्धेत प्रथम- स्नेहल छाजेड, द्वितीय- किर्ती देहरेकर, तृतीय- प्रतिभा सासवडे तर उत्तेजनार्थ- सुरेखा जाजू, रत्ना नवसुपे, वृषाली गायकवाड यांनी बक्षिसे मिळविली तर चारोळी स्पर्धेत प्रथम आशा साठे, द्वितीय- समीक्षा वायकर, तृतीय- सीमा काळे, उत्तेजनार्थ- अश्विनी घोडेकर, कमल ससे, सारिका कोठारी यांनी बक्षिसे मिळविली.लोकमतचे संस्थापक संपादक स्वर्गीय जवाहरलालजी दर्डा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर नीता फुलारी, संगीता भोसले, वंदना सुदामे, अलका मुंदडा, छाया कर्डिले, परिक्षक शारदा पोखरकर, सुजाता कांबळे आदी सखी उपस्थित होत्या.सृष्टीच्या सौंदर्याचा अविष्कार असलेला श्रावण सखींनी उत्साहपूर्ण वातावरणात साजरा केला. रिमझिम पावसात सखींनी लक्षणीय संख्येने उपस्थित राहून या मन-तनाला चिंब करणाऱ्या सोहळ्याचा आनंद घेतला. या कार्यक्रमात येथील आयएसडीटी कॉलेजच्या विद्यार्थिनींनी फॅशन शो सादर केला. त्यामध्ये त्यांनी मॅजिक ट्युब, महाराष्ट्रीयन तडका, ओरीगामी, वृक्ष वाचवा अशा विविध संकल्पना घेऊन फॅशन शो सादर केला.उखाणा स्पर्धेत सखींनी आपल्या पतीरायांचे गुणगान गाणारे विविध उखाणे घेतले तसेच श्रावण सोहळ्यासाठी आयोजित या स्पर्धेसाठी खास श्रावणाचे महत्त्व सणवाराचे महत्त्व सांगणारे उखाणेही सखींनी सादर केले.आय.एस.डी. कॉलेजच्या वतीने दीपाली तेलंग, गौरी देशपांडे, उमेश गंगुल, प्रणोती ससाणे, रूपाली बलदोटा, पूजा गोवर्धन यांनी फॅशन शोचे नियोजन केले. शितल चौधरी, इंदिरा तिवारी, सोनल भांगे, जोत्सना लिमजे या सखींनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नम्रता गिरवले यांनी केले तर आभार लोकमत सखी मंच संयोजिका नूतन शिंदे यांनी मानले.