शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
3
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
4
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
5
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
6
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
7
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
8
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
9
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
10
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
11
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
12
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
13
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
14
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
15
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
16
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
17
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
18
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
19
HSC Result 2026: महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
20
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
Daily Top 2Weekly Top 5

आदर्श गाव राळेगणसिद्धीत मतदानाच्या पूर्वसंध्येला घडला धक्कादायक प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2021 21:44 IST

Ralegan Siddhi Gram Panchayat Election News : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचे गाव असलेल्या राळेगणसिद्धीमध्येही यावेळी ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध न होता मतदान होत आहे.

अहमदनगर : राज्यातील १४ हजारहून अधिक ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी गेला पंधरवडाभर धुरळा उडाला होता. दरम्यान, प्रचार समाप्त होऊन आता उद्या या ग्रामपंचायतींसाठी मतदान होणार आहे. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचे गाव असलेल्या राळेगणसिद्धीमध्येही यावेळी ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध न होता मतदान होत आहे. मात्र या मतदानाच्या पूर्वसंध्येला आदर्श गाव असलेल्या राळेगणसिद्धीच्या प्रतिष्ठेला धक्का लावणारा प्रकार गावात घडला आहे.आदर्श गाव असलेल्या राळेगणसिद्धी येथे ग्रामपंचायत निवडणुकीत आचारसंहिता भंग झाल्याचे निष्पन्न झाले आहे. मतदानाच्या पूर्वसंध्येला मतदारांना साड्या वाटप करताना भरारी पथकाने दोघांना पकडले आहे. या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.दरम्यान, गावोगावच्या निवडणुकीत दोन किंवा त्यापेक्षा अधिक पॅनल करून निवडणूक लढविली जात असतानाच ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या राळेगणसिद्धी गावात चक्क एकच पॅनल यंदाच्या निवडणुकीला सामोरे जात आहे. राळेगणसिद्धीच्या इतिहासात प्रथमच दोन्ही विरोधकांनी एकत्र येऊन एकच पॅनल उभा केला आहे. तर या पॅनलविरोधात अपक्ष उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उरतले आहेत. या उमेदवारांनीही साध्या पद्धतीने प्रचार करीत टीका टाळत विकासाच्या मुद्यांवर भर दिला आहे.राळेगणसिद्धी (ता. पारनेर) येथे गावपातळीवरील निवडणुकीत एकमेकांचे विरोधक असलेले लाभेश औटी व जयसिंग मापारी यांनी यावर्षी ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न केले. ते दोघेही एकत्र आले. मात्र, काही लोकांना निवडणुकीसाठी उभे रहायचे असल्याने त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरले. ९ पैकी सात जागांवर अपक्ष उमेदवारांनी अर्ज भरले तर औटी-मापारी यांच्या राळेगणसिद्धी ग्रामविकास पॅनलचे दोन उमेदवार बिनविरोध निवडून आले.

 

 

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूक 2024AhmednagarअहमदनगरMaharashtraमहाराष्ट्र