शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
2
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
3
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
4
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
5
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
6
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
7
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
8
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
9
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
10
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
11
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
12
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
13
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
14
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
15
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
16
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
17
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
18
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
19
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
20
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस घटनास्थळी पोहोचला, पण...; तरुणाच्या हत्या प्रकरणात धक्कादायक माहिती उघड 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2025 00:22 IST

सीसीटीव्ही फुटेजमधून हा कर्मचारी मारहाण झालेल्या परिसरात गेलेला दिसतो.

Ahilyanagar Murder: वैभव नायकोडी याच्या हत्येपूर्वी त्याला मारहाण झाल्याची माहिती एमआयडीसी वैभव नायकोडी पोलिस ठाण्यातील कर्मचाऱ्याला मिळाली होती. संबंधित कर्मचारी घटनास्थळी गेलाही होता. परंतु, आरोपींना न रोखता तो परत आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. याबाबत आता पोलिस अधीक्षकांनी चौकशी सुरु केली आहे.

सावेडी उपनगरात ढवण वस्ती येथे राहणाऱ्या वैभव शिवाजी नायकोडी (वय १९) याची २२ फेब्रुवारी रोजी अपहरण करून हत्या करण्यात आली. आरोपींनी मयत तरुणाचे सकाळी साडेआठ वाजता अपहरण केले होते. ही माहिती एमआयडीसी पोलिस ठाण्यातील पोलिस कर्मचाऱ्याला मिळाली होती. तो घटनास्थळी जाऊन परत आला. सीसीटीव्ही फुटेजमधून हा कर्मचारी मारहाण झालेल्या परिसरात गेलेला दिसतो. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी शहर विभागाचे पोलिस उपअधीक्षक अमोल भारती यांची नियुक्ती करण्यात आली आहे. खुनाच्या गुन्ह्यात अटक केलेले आरोपी सराईत गुन्हेगार आहेत. त्यांच्याविरोधात एमआयडीसी पोलिस ठाण्यातच विविध कलमांन्वये गुन्हे दाखल आहेत. असे असताना एमआयडीसी पोलिसांनी या प्रकरणाकडे दुर्लक्ष का केले? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

आरोपी ताब्यात असूनही छडा लागला नाहीआरोपींना २७ फेब्रुवारी रोजी तोफखाना पोलिसांनी ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान वैभव आमच्या तावडीतून पळून गेला. तो कुठे गेला हे माहिती नाही, अशी दिशाभूल करणारी माहिती आरोपींनी दिली. त्यामुळे घटनेची उकल करण्यात अपयश आले.

हाडेही गायब केलीआरोपींनी मयताचे दहन केले. त्यानंतर त्याच्या हाडांचीसुद्धा विल्हेवाट लावली. पोलिसांनी राखेची अक्षरशः चाळणी करून हाडांचे बारीक अवशेष फॉरेन्सिक तपासणीसाठी गोळा केले आहेत.

आईने केली होती तक्रारमयताच्या आईने २५ फेब्रुवारीला मुलगा बेपत्ता असल्याची तक्रार तोफखाना पोलिस ठाण्यात दिली. पोलिसांनी तक्रारीची दाखल घेतली नाही. त्यानंतर मयताच्या आईनेच पुन्हा २७ फेब्रुवारीला तोफखाना पोलिस ठाण्यात येऊन आपल्या मुलाला लपका व त्याच्या साथीदारांनी कारमधून पळवून नेले, अशी तक्रार दिली. त्यानंतर तोफखाना पोलिसांनी तपास हाती घेतला.

गुन्हे शाखेने केली उकलज्यांनी अपहरण केले त्या चार आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले. पण ज्याचे अपहरण झाले तो वैभव मिळून आला नव्हता. त्यामुळे जिल्हा पोलिस अधीक्षक यांना संशय आला. त्यांनी दिनेश आहेर यांना तपासाचे आदेश दिले. त्यांनी घटनेचा उलगडा केला.

मयताला अमानुष मारहाणमयत नायकोडी याला अगोदर निर्जनस्थळी मारहाण करण्यात आली. नंतर नवनागापूर येथील चेतना कॉलनीत असलेल्या फ्लॅटवर मारहाण झाली. त्यात त्याचा मृत्यू झाला. पुरावा नष्ट करण्यासाठी आरोपींनी मृतदेह डोंगरात नेऊन जाळला. 

टॅग्स :Ahilyanagarअहिल्यानगरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस