धक्कादायक : ‘त्या’ चिमुरडीचा मृतदेह सापडला विहिरीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 11:34 IST2021-02-15T11:33:51+5:302021-02-15T11:34:17+5:30

ब्राह्मणी गावात ऊस तोडणी कामगाराच्या बेपत्ता साडेचार वर्ष मुलीचा मृतदेह सोमवारी सकाळी विहिरीत आढळून आला आहे. ब्राह्मणी-जुना वांबोरी रोड रस्त्यालगत ऊस तोडणी कामगाराचा अड्डा आहे. त्यापासून एक हजार मीटर अंतरावरील विहिरीमध्ये मृतदेह आढळून आला असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक गणेश शेळके यांनी दिली.

Shocking: The body of 'that' Chimurdi was found in the well | धक्कादायक : ‘त्या’ चिमुरडीचा मृतदेह सापडला विहिरीत

धक्कादायक : ‘त्या’ चिमुरडीचा मृतदेह सापडला विहिरीत

राहुरी : तालुक्यातील ब्राह्मणी गावात ऊस तोडणी कामगाराच्या बेपत्ता साडेचार वर्ष मुलीचा मृतदेह सोमवारी सकाळी विहिरीत आढळून आला आहे. ब्राह्मणी-जुना वांबोरी रोड रस्त्यालगत ऊस तोडणी कामगाराचा अड्डा आहे. त्यापासून एक हजार मीटर अंतरावरील विहिरीमध्ये मृतदेह आढळून आला असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक गणेश शेळके यांनी दिली.

शुक्रवारी मध्यरात्रीपासून मुलगी ऊस तोडणी कामगारांच्या झोपडीतून बेपत्ता होती. शनिवारी कुटुंबीयांनी दिवसभर तपास केला. शोध लागला नव्हता. अखेर शनिवारी सायंकाळी पोलिस ठाण्यात मुलीचे अपहरण झाल्याचा गुन्हा दाखल झाला. रविवारी सकाळ पासून श्रीरामपूर पोलीस विभागाचे डीवायएसपी संदीप मिटके यांच्यासह नगरमधील शीघ्र कृती दलाच्या पथकाकडून सर्च ऑपरेशन सुरू होते.

दरम्यान, सोमवारी सकाळी ब्राम्हणी गावातच वांबोरी रोड लगत एका विहीरीत बेपत्ता झालेल्या मुलीचा मृतदेह आढळून आला आहे.

Web Title: Shocking: The body of 'that' Chimurdi was found in the well