शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
3
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
4
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
5
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
6
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
7
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
8
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
9
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
10
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
11
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
12
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
13
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
14
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
15
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
16
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
17
ममता बॅनर्जींची सत्ता गेली! पराभवानंतर अभिषेक बॅनर्जींची पहिली प्रतिक्रिया; मतमोजणीवर उपस्थित केले गंभीर प्रश्न
18
Video: अंदमानच्या अथांग समुद्रात फडकवला तिरंगा! 'अंडरवॉटर' ध्वजारोहणाचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड
19
पाच राज्यांचे निकाल, काँग्रेसच्या पदरात काय? कोणत्या राज्यात किती जागा मिळाल्या?
20
“केरळच्या सुज्ञ जनतेची काँग्रेसचा विचार, राहुल गांधींच्या नेतृत्वाला साथ”: हर्षवर्धन सपकाळ
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेनाप्रमुखांच्या भाषणाने सेनेला टाकले अडचणीत

By admin | Updated: September 28, 2014 23:27 IST

अहमदनगर: शिवसेनेच्या उमेदवारांनी प्रचार फेरी, पक्षाच्या कार्यालयाजवळ, प्रचार सभांच्या ठिकाणी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची भाषणे ऐकविण्याचे नेहमीप्रमाणे नियोजन केले आहे.

अहमदनगर: विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी शिवसेनेच्या उमेदवारांनी प्रचार फेरी, पक्षाच्या कार्यालयाजवळ, प्रचार सभांच्या ठिकाणी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची भाषणे ऐकविण्याचे नेहमीप्रमाणे नियोजन केले आहे. मात्र या भाषणांमध्ये बाळासाहेब ठाकरे यांनी भाजपाची स्तुती करून शिवसेना-भाजपा युतीला निवडून देण्याचे केलेले आवाहन शिवसेनेला अडचणीचे ठरले आहे. यासाठी आता या भाषणांचे ‘एडिटिंग’ करण्याचा निर्णय शिवसेनेने स्थानिक पातळीवर घेतला आहे.विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवार आता प्रचाराच्या अनेक कल्पना लढवित आहेत. पक्षाची धोरणे, पक्षाचे चिन्ह, पक्षाची विचारप्रणाली, पक्षाचे दिवंगत आणि हयात नेते, त्यांची भाषणे यांचा प्रचारामध्ये खुबीने वापर करण्यात येत आहे. त्याला तंत्रज्ञानाची जोड दिली जात आहे. शिवसेनेच्या एका उमेदवाराने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या भाषणांची आॅडिओ आणि व्हीडिओ कॅसेट नागरिकांना ऐकविण्याचे नियोजन केले आहे. त्यासाठी खास रथ तयार करण्यात आले आहेत. या रथाच्या दोन्ही बाजूला व्हीडिओमधून बाळासाहेब ठाकरे यांचे भाषण लोकांना दिसणार आहे. हा रथ रात्री फिरला तर ठाकरे यांचे भाषण बघायला आणि ऐकायला मिळणार आहे. आजही ठाकरे यांच्या भाषणांच्या कॅसेट लावल्या तरी लोक त्या कान देऊन ऐकत आहेत. मात्र यावेळी राजकीय स्थिती बदलल्याने ठाकरे यांची भाषणे अडचणीची ठरली आहेत.बाळासाहेब ठाकरे यांच्या भाषणांमध्ये शिवसेनेबरोबरच भाजपाचाही उल्लेख आलेला आहे. तसेच शिवसेना-भाजपाला निवडून देण्याचे आवाहन भाषणांमध्ये अनेकवेळा केलेले आहे. ही वाक्ये भाषणांमध्ये ठेवायची की नाही? या संभ्रमात शिवसेनेचे उमेदवार आहेत. काही स्थानिक कार्यकर्ते मात्र भाषणांचे ‘एडिटिंग’ करून त्यातील भाजपाचा, युतीचा उल्लेख काढून टाकण्याच्या विचारात आहेत. शिवसेना-भाजपा युती तुटल्यामुळे ठाकरे यांच्या भाषणाचा भाजपाला फायदा होणार नाही, यासाठी कार्यकर्ते भाजपाचा भाषणात उल्लेख नकोच, असा आग्रह करीत आहेत. ठाकरे यांचे प्रखर हिंदुत्त्वाचे विचार ऐकण्यासाठी आजही नागरिक रस्त्यावर थांबून भाषण ऐकत आहेत. बाळासाहेब ठाकरेंच्या भाषणांच्या सीडी ऐकल्याने भाजपाच्या गोटात मात्र उकळ्या फुटल्या होत्या. शिवसेनेच्या मदतीला बाळासाहेब ठाकरे यांची भाषणेही आता कालबाह्य झाल्याची टीका एका भाजपा नेत्याने दिली.(प्रतिनिधी)