शिवसैनिकांनी समन्वयातून जनतेची कामे करावीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:25 IST2021-09-09T04:25:41+5:302021-09-09T04:25:41+5:30

चिचोंडी पाटील : गावातील जुन्या व नवीन शिवसैनिकांनी समन्वयातून जनतेच्या विकासकामांचे प्रश्न मार्गी लावावेत, असे आवाहन शिवसेनेचे जिल्हाप्रमुख शशिकांत ...

Shiv Sainiks should do public works in coordination | शिवसैनिकांनी समन्वयातून जनतेची कामे करावीत

शिवसैनिकांनी समन्वयातून जनतेची कामे करावीत

चिचोंडी पाटील : गावातील जुन्या व नवीन शिवसैनिकांनी समन्वयातून जनतेच्या विकासकामांचे प्रश्न मार्गी लावावेत, असे आवाहन शिवसेनेचे जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे यांनी केले.

शिवसंपर्क अभियानांतर्गत नगर तालुक्यात शिवसेनेच्या गाव तिथे शाखा अभियानाचा प्रारंभ जिल्हाप्रमुख प्रा. शशिकांत गाडे यांच्या हस्ते चिचोंडी पाटील येथे करण्यात आला. यावेळी उपजिल्हाप्रमुख संदेश कार्ले, जिल्हा परिषद सदस्य शरद झोडगे, तालुकाप्रमुख राजेंद्र भगत, पंचायत समिती सभापती संदीप गुंड, इंजिनिअर प्रवीण कोकाटे, उपतालुकाप्रमुख प्रकाश कुलट, जिवाजी लगड, अजय बोरुडे, माजी सरपंच डॉ. मारुती ससे, माजी उपसभापती दत्तात्रय हजारे, कामधेनू पतसंस्था अध्यक्ष डॉ. ययाती फिसके, सोसायटी अध्यक्ष राजेंद्र कोकाटे, उपाध्यक्ष काशीनाथ बेल्हेकर, माजी सरपंच पांडुरंग कोकाटे, पंडित कोकाटे, आदिनाथ कोकाटे, चंद्रकांत सदाफुले, सुरेश ठोंबरे, सोसायटी संचालक भाऊसाहेब वाडेकर, अजय कांकरिया, उपसरपंच भाऊसाहेब ठोंबरे, भगवान पवार, महादेव खडके, दत्ता जाधव, बाबासाहेब शेंडकर, जयसिंग दळवी, शशिकांत आगलावे, ग्रामपंचायत सदस्य विश्वसागर कोकाटे, महादजी कोकाटे, संदीप काळे, प्रशांत कांबळे, माउली ठोंबरे, राजूभाऊ कोकाटे, बाबासाहेब परकाळे, वनाधिकारी किसनराव आगलावे, महादेव कोकाटे, गणेश इंगळे, दत्तात्रय कोकाटे, सुधीर कोकाटे, संजय शिंदे, दादासाहेब लगड, संजय ठोंबरे, बाळासाहेब खांदवे, अनिल चव्हाण, संतोष वाडेकर, रमेश कुलथे, गोरख वाडेकर, रघुनाथ कोकाटे आदी उपस्थित होते.

प्रवीण कोकाटे म्हणाले, शिवसेनेच्या माध्यमातून सर्वसामान्य कार्यकर्त्यांना न्याय मिळतो. मिळालेल्या पदाच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेची चांगली सेवा करता येते. जिल्हा परिषद व पंचायत समितीमार्फत चिचोंडी पाटील येथे केलेल्या विविध कामांची त्याचप्रमाणे राबविलेल्या शासकीय योजनांची माहिती त्यांनी दिली. भगवान पवार यांनी आभार मानले.

----

080921\img-20210902-wa0251.jpg

चिचोंडी पाटील येथे शिवसेना फलकाचे अनावरण करतांना जिल्हा प्रमुख प्रा शशीकांत गाडे समवेत शिवसेना कार्यकर्ते

Web Title: Shiv Sainiks should do public works in coordination