शहरं
Join us  
Trending Stories
1
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
2
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
3
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
4
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
5
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
6
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
7
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
8
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
9
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
10
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
11
Latest Marathi News LIVE Updates: आमच्यासाठी निवडणूक नाही तर दादांच्या स्मृतींचा यज्ञ - देवेंद्र फडणवीस
12
सामान्य फोनपेक्षा वेगळा! सॅटेलाइट फोन म्हणजे नक्की काय? भारतात बाळगल्यास होऊ शकते थेट जेल
13
Mumbai Local: मोठा अपघात टळला! CSMT स्थानकात दोन लोकल समोरासमोर! सिग्नल बिघाड अन् मोटरमनचे प्रसंगावधान (Watch Video)
14
IAS Kinjal Singh : संघर्षातून गाठलं यशाचं शिखर; लहानपणी वडिलांची हत्या, आईचा कॅन्सरने मृत्यू, जिद्दीने झाली IAS
15
Video: "नरेंद्र मोदी हे दहशतवादी"; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंचे धक्कादायक वक्तव्य, नंतर केली सारवासारव...
16
पाकिस्तानाचा विषारी डाव! फाजिल्कामध्ये काळवंडले नद्यांचे पाणी; पंजाबची जनता आजाराच्या विळख्यात
17
१० हजार+ धावा, १७५ विकेट्स, पण आयपीएलमध्ये ५ वर्षे बेंचवर बसून राहिला 'हा' अष्टपैलू खेळाडू
18
Narasimha Navratri 2026: नृसिंह नवरात्र विशेष: नऊ दिवस नऊ उपासना; संकटमुक्तीसाठी करा ही विशेष साधना!
19
भोंगळ कारभार! रुग्णालयात गर्दी वाढली, सुरक्षा रक्षक झाला 'डॉक्टर'; जखमी तरुणाला घातले टाके
20
IPL 2026: MI vs CSK सामन्याआधी चेन्नईला मोठा धक्का; मराठमोळा स्टार क्रिकेटर स्पर्धेतून बाहेर
Daily Top 2Weekly Top 5

शेवगाव, पाथर्डीत सरासरीच्या सव्वाशे टक्के पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:25 IST

अहमदनगर : गत महिन्यात जिल्ह्यात झालेला पाऊस हा सरासरीच्या ६० ते ६५ टक्के इतकाच होता. मात्र गत आठवड्यात झालेल्या ...

अहमदनगर : गत महिन्यात जिल्ह्यात झालेला पाऊस हा सरासरीच्या ६० ते ६५ टक्के इतकाच होता. मात्र गत आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीने जिल्ह्यातील पावसाची टक्केवारी ९१ टक्क्यांपर्यंत वाढली आहे. त्यात चार तालुक्यांमधील पाऊस सरासरीच्या ९० टक्के इतका झाला आहे, तर दक्षिण भागातील पारनेर, जामखेड आणि कर्जत या तीन तालुक्यांमधील पावसाची टक्केवारी सरासरीच्या ७५ टक्के इतकी आहे. सर्वाधिक पाऊस शेवगाव व पाथर्डी तालुक्यात असून पावसाची ही टक्केवारी सव्वाशे टक्के आहे.

हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्याप्रमाणे गत आठवड्यात जिल्ह्यातील दक्षिण भागात अतिवृष्टी झाली. नदी, नाल्यांना पूर आले. जनावरे वाहून गेली. नगर, शेवगाव, पाथर्डी, श्रीगोंदा या तालुक्यांत चांगला पाऊस झाला. त्यामुळे जिल्ह्यात झालेला एकूण पाऊस ९१ टक्के इतका झाला आहे. गतवर्षी ५ सप्टेंबरपर्यंत १६७ टक्के इतका पाऊस झाला होता. त्या तुलनेत यंदा पावसाचे प्रमाण कमीच असल्याचे दिसले.

शनिवारी जिल्ह्यात पावसाला पुन्हा सुरुवात झाली. पुन्हा शेवगाव, पाथर्डी, नगर या तीन तालुक्यांत पुन्हा एकदा जोरदार पाऊस झाला. बीड-अहमदनगर या दोन्ही जिल्ह्यांच्या भागात मोठा पाऊस झाल्याने जामखेड तालुक्यातील नद्या-नाल्यांनाही पूर आला. शनिवारी नगर (३२.२), पारनेर (१७.७), श्रीगोंदा (३२.४), कर्जत (२८.८), जामखेड (३३.६), शेवगाव (५२.८), पाथर्डी (५८.१), नेवासा (३३.४), राहुरी (१५.६), संगमनेर (७.३), अकोले (६.५), कोपरगाव (५३.), श्रीरामपूर (१४.५), राहाता (८.०). असा एकूण सरासरी २४.६ मि.मि. इतका पाऊस झाला.

जिल्ह्याची पावसाची सरासरी ही ४४८ मि.मी. इतकी आहे. यंदा आतापर्यंत ४०९ मि.मि. इतका पाऊस झाला आहे. ही टक्केवारी सरासरीच्या ९१ टक्के इतकी आहे. गतवर्षी याचवेळी सरासरीच्या १६७ टक्के इतका पाऊस झाला होता.

------------

आतापर्यंत झालेला पाऊस (सरासरीच्या टक्के)

तालुका टक्के

अहमदनगर ८८.५

पारनेर ७४.१

कर्जत ७६.५

जामखेड ७७.३

शेवगाव १११.६

पाथर्डी १३४.९

नेवासा ८९.२

राहुरी ९१.१

संगमनेर ८०.९

अकोले ११२.५

कोपरगाव ९९.९

श्रीरामपूर ९२.३

राहाता ७३.०

एकूण ९१.३

---------------------

अतिवृष्टीचा पुन्हा इशारा

५ ते ९ सप्टेंबर या कालावधीत गटगडाटासह मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, कोकणात सर्वदूर पावसाचा इशारा दिला आहे. नगर जिल्ह्यात ५, ६ आणि ७ सप्टेंबरला जोरदार पावसाचा इशारा दिलेला आहे. त्यामुळे शेतकरी, नागरिकांनी दक्षता घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.