शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

सात लाखांचे मोबाईल हॅण्डसेट लंपास

By admin | Updated: May 29, 2024 14:20 IST

अहमदनगर: मार्केटयार्ड चौकातील सॅमसंग एका मोबाईल हॅण्डसेटच्या दुकानातून सात ते आठ लाख रुपयांचा माल चोरीला गेला. ही घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली.

अहमदनगर: मार्केटयार्ड चौकातील सॅमसंग एका मोबाईल हॅण्डसेटच्या दुकानातून सात ते आठ लाख रुपयांचा माल चोरीला गेला. ही घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली. दुकानाचे शटरचे कुलुप तोडून चोरट्यांनी माल लंपास केला. या प्रकरणी शोरुमचे मालक धीरज डागा यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. नगर-मनमाड रोडवरील झोपडी कॅन्टीन परिसरातील माऊली संकुलातील राम एजन्सी यांच्या सॅमसंग शोरुमचे शटर चोरट्यांनी उचकटले. ही घटनाही मंगळवारी सकाळी उघडकीस आली. याबाबत मनीष मेघांनी यांनी तोफखाना पोलिसांना माहिती दिली. शो-रुमच्या गाळ््याचे कुलुप तोडण्याचाही प्रयत्न झाला. सावेडी भागातील झोपडी कॅन्टीन परिसरातील साई आयकॉन कॉम्प्लेक्समधील पीटर इंग्लड या दुकानातही रविवारी (दि.१४) चोरी झाली. या दुकानातून सात ते आठ लाखांचे तयार कपडे चोरीला गेले आहेत. शटरचे कुलुप लावण्याची पट्टी कापून चोरट्यांनी दुकानात प्रवेश केला होता. रोख पाच हजार रुपये आणि सात लाखांचे कपडे चोरट्यांनी लंपास केले. या दुकानातील शो-पीस पुतळेही चोरण्यात आले आहेत. चोरी गेलेल्या मालात शर्टचे १४०० बॉक्स होते. चोरीला माल नेण्यासाठी एखाद्या मोठ्या वाहनाचा वापर झाल्याची शक्यता व्यक्त झाली आहे. शोरुमचे मालक शाम रामदास वैराळ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. टीव्हीसेंटर रोडवरील तोफखाना पोलीस ठाण्याशेजारी असलेल्या एका दुकानातूनही चोरी झाल्याची घटना गेल्या आठवड्यात घडली होती.