शिर्डी उर्दू हायस्कूल शाळेची गुगल डाॅक्युमेंट्रीसाठी निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2020 04:17 IST2020-12-25T04:17:06+5:302020-12-25T04:17:06+5:30

लॉकडाऊनच्या कालावधीत शिर्डी उर्दू हायस्कूल शाळेने गुगल मीटद्वारे ऑनलाईन शिक्षण दिले. त्याचबरोबरच व्हॉटसॲपच्या माध्यमातून गृहपाठ, चाचणी, प्रश्नमंजूषा सराव घेण्यात ...

Selection of Shirdi Urdu High School for Google Documentary | शिर्डी उर्दू हायस्कूल शाळेची गुगल डाॅक्युमेंट्रीसाठी निवड

शिर्डी उर्दू हायस्कूल शाळेची गुगल डाॅक्युमेंट्रीसाठी निवड

लॉकडाऊनच्या कालावधीत शिर्डी उर्दू हायस्कूल शाळेने गुगल मीटद्वारे ऑनलाईन शिक्षण दिले. त्याचबरोबरच व्हॉटसॲपच्या माध्यमातून गृहपाठ, चाचणी, प्रश्नमंजूषा सराव घेण्यात आला. प्रत्येक विषयाच्या पीपीटी, व्हिडीओ बनवून यूट्यूबवरील इंग्रजी अध्यापनाने प्रभावीत होऊन गुगलने शैक्षणिक व्हिडीओची दखल घेतली. गुगलने शाळेशी संपर्क साधून गुगलसाठी डॉक्युमेंट्री बनविण्याची इच्छा व्यक्त केली. महाराष्टातून शिर्डी उर्दू हायस्कूल या एकमेव शाळेची निवड केली. संस्थेने डॉक्युमेंट्री बनविण्यासाठी परवानगी दिली आहे. २१ व २२ डिसेंबर रोजी गुगलच्या टीमने प्रत्यक्ष शाळा, वर्गातील शिक्षण, ऑनलाईन शिक्षण इत्यादीचे चित्रीकरण केले. शाळेचे इंग्रजी विषय शिक्षक अजमत इकबाल यांची मुलाखत घेतली.

ग्रामीण भागातून सायकलवर शाळेत येणाऱ्या मुली, घरातील ऑनलाईन शिक्षण घेणारे विद्यार्थी यांचे चित्रीकरण गुगल टीमने केले. या सर्व बाबींची अहमदनगर शिक्षण विभागाने यांनी दखल घेऊन शाळेच्या ऑनलाईन उपक्रमाचे विशेष कौतुक केले. राहाता पंचायत समिती शिक्षण विभागाचे गटशिक्षणाधिकारी काळे यांनी गुगल मीटद्वारे प्रत्यक्ष गुगल टीमशी संभाषण केले. शिक्षण विस्तार अधिकारी ज्ञानेश्वर वाकचौरे यांनी शाळेला प्रत्यक्ष भेट दिली. त्याचीही गुगल टीमने मुलाखत घेतली. कोविड कालावधीत तालुक्यात ऑनलाईन अध्यापन कसे करण्यात आले. याबाबत तपशीलवार मुलाखतीद्वारे चर्चा करण्यात आली. संस्थेच्या वतीने गुगल टीम व विस्तार अधिकारी वाकचौरे यांचा सत्कार करण्यात आला. संस्थेचे चेअरमन हाजी बिलाल शेख, उपाध्यक्ष हाजी गणीभाई पठाण पदाधिकारी उपस्थित होते. शाळेचे शिक्षण अजमत इकबाल, मुख्याध्यापक पटेल कौतुक करण्यात आले.

Web Title: Selection of Shirdi Urdu High School for Google Documentary