शाळा बंद असल्याने मुलांसोबतच पालकांचेही आरोग्य बिघडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 04:24 IST2021-08-26T04:24:00+5:302021-08-26T04:24:00+5:30

कोरोनामुळे गेल्या दीड वर्षांपासून शाळा बंद असल्याने विद्यार्थी घरूनच मोबाइलवर ॲानलाइन अभ्यासक्रम शिकत आहेत. यात बहुतांशी मुलांच्या हाती लहान ...

As the school was closed, the health of the children as well as the parents deteriorated | शाळा बंद असल्याने मुलांसोबतच पालकांचेही आरोग्य बिघडले

शाळा बंद असल्याने मुलांसोबतच पालकांचेही आरोग्य बिघडले

कोरोनामुळे गेल्या दीड वर्षांपासून शाळा बंद असल्याने विद्यार्थी घरूनच मोबाइलवर ॲानलाइन अभ्यासक्रम शिकत आहेत. यात बहुतांशी मुलांच्या हाती लहान वयातच स्मार्ट फोन मिळाले आहेत. यामुळे अल्पवयीन मुलांनाही सोशल मीडियाची ओढ लागली आहे. अभ्यासक्रम संपला तरी मुले मोबाइलवर रेंगाळतात व त्यात गेम किंवा इतर मनोरंजनाचे व्हिडिओ पाहतात. दुसरीकडे मोबाइलमुळे कुटुंबातील सदस्यांशी संवाद कमी होत आहे. मोबाइलची सवय लागून विद्यार्थ्यांचा स्वभाव चिडचिडेपणाचा होत आहे. मुलांना या वातावरणातून बाहेर काढता काढता तणावातून पालकांच्या मानसिक आरोग्यविषयक समस्यांमध्ये भर पडत आहे. मुलांना त्यांच्यावरील बंधनांमध्ये अनावश्यक वाढ झाल्याची भावना निर्माण होऊन मानसिक आरोग्यविषयक समस्यांचा सामना करावा लागत आहे.

-------------

वर्गनिहाय विद्यार्थी

पहिली -६८७१६ दुसरी - ७४८९६ तिसरी - ७८४५१ चौथी- ८०४४९ पाचवी- ७९६०५ सहावी - ७९७१६सातवी- ७९७७८आठवी- ८००६८नववी- ८१२००दहावी- ७३०००

----------------

मुलांच्या समस्या

ऑनलाइन शिक्षणामुळे अभ्यासाव्यतिरिक्त सोशल मीडियाची ओढ आणि ऑनलाइन गेम खेळण्याचे प्रमाण वाढले आहे. परिणामी, कुटुंबातील सदस्यांशी संवाद कमी होत आहे. मुलांना आपल्या भावना व्यक्त करता येत नाहीत. यामुळे मुलांमध्ये लठ्ठपणा, निद्रेचे बदललेले चक्र, चिडचिडेपणा, एकलकोंडेपणा वाढून चिडचिड वाढली आहे.

----------

पालकांच्या समस्या

ऑनलाइन अभ्यासक्रमाच्या स्पर्धेत पाल्य इतरांच्या तुलनेत मागे राहण्याची भीती पालकांमध्ये वाढीस लागली आहे. मुलांमध्ये डिप्रेशन, तणाव, चिंता विकार, निद्रानाश या आजाराचे प्रमाण वाढले आहे. यामुळे पालकांनी मुलांवर लक्ष ठेवणे खूप गरजेचे आहे, असे मानसोपचार तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

Web Title: As the school was closed, the health of the children as well as the parents deteriorated