रोटरी क्लबतर्फे दहा शाळांना सॅनिटायझर स्टॅन्ड वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 04:21 IST2021-04-16T04:21:02+5:302021-04-16T04:21:02+5:30

----------------- यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार अहमदनगर : गुलमोहर रोडवरील प्रा. किरण कालरा यांच्या विद्यार्थ्यांनी देशातील नामांकित आयआयटी कॉलेज, देशातील पहिल्या ...

Sanitation stand distributed to ten schools by Rotary Club | रोटरी क्लबतर्फे दहा शाळांना सॅनिटायझर स्टॅन्ड वाटप

रोटरी क्लबतर्फे दहा शाळांना सॅनिटायझर स्टॅन्ड वाटप

-----------------

यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार

अहमदनगर : गुलमोहर रोडवरील प्रा. किरण कालरा यांच्या विद्यार्थ्यांनी देशातील नामांकित आयआयटी कॉलेज, देशातील पहिल्या दहा नामांकन असलेल्या मेडिकल व इंजिनियरिंग कॉलेजमध्ये प्रवेश मिळविले आहेत. अशा गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी नगरसेवक गणेश भोसले, मर्चंट बँकेचे संचालक संजय चोपडा, किशोर डोंगरे, डॉ. सोमोध तिरुडकर, डॉ. अमोल कासवा, डॉ. गुरुशीन मक्कर, गुणवंत विद्यार्थी सानिका कानडे, मृण्मयी धोंडे, सायली पटवर्धन, शांभवी सापा आदी उपस्थित होते. यावेळी आ. जगताप म्हणाले, युवक, विद्यार्थ्यांनी राजकारणाकडे न वळता शिक्षणाकडे लक्ष देत डॉक्टर, इंजिनिअर व्हावे.

-------------

कोविड सेंटर उभारण्याची मनसेची मागणी

अहमदनगर : सद्यस्थितीत नगर शहरात कोरोना रुग्णांसाठी आयसीयू, ऑक्सिजन बेड, व्हेंटिलेटर बेड कमी पडत आहेत. पुढच्या काळामध्ये एकूण कोरोना रुग्णसंख्येचा वेग पाहता बेडची संख्या वाढवावी लागणार आहे. यासाठी जर प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी सर्व सोयीयुक्त कोविड सेंटर जर उभी केली तर रुग्णांची धावपळ कमी होईल. यासाठी प्रत्येक तालुक्यात संबंधित आमदारांनी एक कोविड सेंटर उभारावे, अशी मागणी मनसेचे डॉ. संतोष साळवे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

Web Title: Sanitation stand distributed to ten schools by Rotary Club