शहरं
Join us  
Trending Stories
1
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
2
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
3
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
4
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
5
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
6
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
7
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
8
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
9
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
10
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
11
Latest Marathi News LIVE Updates: आमच्यासाठी निवडणूक नाही तर दादांच्या स्मृतींचा यज्ञ - देवेंद्र फडणवीस
12
सामान्य फोनपेक्षा वेगळा! सॅटेलाइट फोन म्हणजे नक्की काय? भारतात बाळगल्यास होऊ शकते थेट जेल
13
Mumbai Local: मोठा अपघात टळला! CSMT स्थानकात दोन लोकल समोरासमोर! सिग्नल बिघाड अन् मोटरमनचे प्रसंगावधान (Watch Video)
14
IAS Kinjal Singh : संघर्षातून गाठलं यशाचं शिखर; लहानपणी वडिलांची हत्या, आईचा कॅन्सरने मृत्यू, जिद्दीने झाली IAS
15
Video: "नरेंद्र मोदी हे दहशतवादी"; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंचे धक्कादायक वक्तव्य, नंतर केली सारवासारव...
16
पाकिस्तानाचा विषारी डाव! फाजिल्कामध्ये काळवंडले नद्यांचे पाणी; पंजाबची जनता आजाराच्या विळख्यात
17
१० हजार+ धावा, १७५ विकेट्स, पण आयपीएलमध्ये ५ वर्षे बेंचवर बसून राहिला 'हा' अष्टपैलू खेळाडू
18
Narasimha Navratri 2026: नृसिंह नवरात्र विशेष: नऊ दिवस नऊ उपासना; संकटमुक्तीसाठी करा ही विशेष साधना!
19
भोंगळ कारभार! रुग्णालयात गर्दी वाढली, सुरक्षा रक्षक झाला 'डॉक्टर'; जखमी तरुणाला घातले टाके
20
IPL 2026: MI vs CSK सामन्याआधी चेन्नईला मोठा धक्का; मराठमोळा स्टार क्रिकेटर स्पर्धेतून बाहेर
Daily Top 2Weekly Top 5

दगडांचा आवाज, कॉप्यांचा पाऊस

By admin | Updated: March 1, 2016 23:33 IST

अहमदनगर : राज्य परीक्षा मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा सुरू आहेत. मंगळवारी दहावीच्या परीक्षेस सुरुवात झाली

अहमदनगर : राज्य परीक्षा मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा सुरू आहेत. मंगळवारी दहावीच्या परीक्षेस सुरुवात झाली असून यापूर्वीच बारावीची परीक्षा सुरू झालेली आहे. या परीक्षा कॉपीमुक्त वातावरणात पार पडाव्यात, यासाठी विविध पातळ्यांवर प्रयत्न सुरू असताना त्यात खंड झालेला नाही. मंगळवारी दहावीच्या पेपर दरम्यान नगर तालुक्यातील एका केंद्रावर कॉपीचा प्रकार घडला. विशेष म्हणजे तपासणी पथक आले असल्याचा इशारा मिळताच विद्यार्थ्यांनी खिडकीतून कॉप्या बाहेर टाकल्या.१६ फे बु्रवारीपासून बारावीच्या परीक्षा सुरू झाल्या होत्या. मराठी वगळता अन्य पेपरला कमी- अधिक कॉपीच्या घटना समोर आल्या होत्या. अशी परिस्थिती दहावीच्या बाबतीत घडू नये, यासाठी दक्षता घेण्याची गरज असताना कॉपीचे प्रकार सर्रास सुरू असल्याचे येथील घटनेवरून सिद्ध झाले आहे. या ठिकाणी पहिल्या मराठीच्या पेपरला मोठ्या प्रमाणात कॉपी सुरू होती. परीक्षा केंद्रावर माध्यमिक शिक्षणाधिकारी सुनंदा ठुबे यांच्या पथकाने भेट दिली. परीक्षा केंद्र तपासणीसाठी पथक येत असल्याचे पाहून परीक्षा केंद्राबाहेर असणाऱ्या मुलांनी पत्र्यावर दगड मारू न कॉपी करणाऱ्या विद्यार्थ्यांना इशारा दिला. पत्र्यावरील दगडाच्या आवाजामुळे विद्यार्थी गोंधळले. ठुबे परीक्षा केंद्राच्या आत येण्यापूर्वी विद्यार्थ्यांनी खिडकीतून कॉप्या बाहेर फे कल्या. पथकाला या ठिकाणी कॉपी करणारे विद्यार्थी आढळले नाहीत. पथक गेल्यानंतर शाळा व्यवस्थापनाने विद्यार्थ्यांनी टाकलेल्या कॉप्या जमा केल्या.यासंदर्भात शिक्षणाधिकारी ठुबे यांच्याशी संपर्क केला असता, त्यांच्या जाण्यापूर्वी किंवा त्या गेल्यानंतर काही घडले असेल, त्यांना याबाबत काही कल्पना नाही. परीक्षा नियंत्रण करणाऱ्या अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांची झडती घेवून त्यांना परीक्षा केंद्रात सोडले होते. यामुळे आता विद्यार्थ्यांकडे कॉप्या आल्या कोठून, असा प्रश्न आहे. (प्रतिनिधी)