राहुरी शहरात जबरी चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2021 04:17 IST2021-01-14T04:17:45+5:302021-01-14T04:17:45+5:30

संतोष नागरे हे सकाळी सात वाजे दरम्यान दुकान उघडण्यासाठी गेले असता दुकानाला लावलेले कुलूपे चोरट्यांनी तोडल्याचे पाहून दुकानात चोरी ...

Robbery in Rahuri city | राहुरी शहरात जबरी चोरी

राहुरी शहरात जबरी चोरी

संतोष नागरे हे सकाळी सात वाजे दरम्यान दुकान उघडण्यासाठी गेले असता दुकानाला लावलेले कुलूपे चोरट्यांनी तोडल्याचे पाहून दुकानात चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. यावेळी त्यांनी राहुरी पोलिसांना खबर दिली. उपनिरीक्षक मधूकर शिंदे, हवालदार अण्णासाहेब चव्हाण, आजिनाथ पालवे, दिनकर चव्हाण, सचिन ताजणे आदि पोलिस पथकाने घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. यावेळी श्वान पथकाला पाचारण करण्यात आले होते. या पथकातील पोलिस नाईक सुरेश डोखे, देवेंद्र सगळगीळे यांनी श्वानपथकाने शोध घेतला.

दरम्यान शुक्लेश्वर परिसरातील कासार गल्ली येथील विजय विठ्ठलराव आकडे यांच्या राहत्या घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश केला. यावेळी घरातील सामानाची उचकापाचक केली. यावेळी कपाटात ठेवलेले १० हजार रूपये रोख रक्कम घेऊन चोरटे पसार झाले. याच परिसरातील सगळगीळे यांचे बंद घर फोडून चोरट्यांनी चोरी केली. सगळगीळे हे बाहेर गावी गेले असल्याने त्यांच्या घरातून नेमका किती मुद्देमाल चोरीला गेला हे समजू शकले नाही. पोलिसांनी शिवाजी चौक परिसरातील काही सीसीटिव्ही कॅमेरे तपासले असता, या चोरीच्या घटना पहाटे तीन ते चार वाजे दरम्यान घडल्या असून चारजण संशयीत रित्या फिरताना दिसत आहेत.

Web Title: Robbery in Rahuri city