रेखा जरे हत्याकांडातील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:15 IST2021-07-02T04:15:38+5:302021-07-02T04:15:38+5:30

अहमदनगर : यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे हत्याकांडातील आरोपी ऋषिकेश ऊर्फ टम्या वसंत पवार याचा गुरुवारी जिल्हा न्यायालयाने ...

Rekha Jare massacre | रेखा जरे हत्याकांडातील

रेखा जरे हत्याकांडातील

अहमदनगर : यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे हत्याकांडातील आरोपी ऋषिकेश ऊर्फ टम्या वसंत पवार याचा गुरुवारी जिल्हा न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळून लावला.

जरे यांच्या हत्याकांडानंतर पोलिसांनी इतर आरोपींसह पवार यालाही अटक केली होती. न्यायालयीन कोठडीत रवानगी झाल्यानंतर पवार याच्यावतीने जिल्हा न्यायालयात जामिनासाठी अर्ज करण्यात आला होता. जिल्हा न्यायाधीश बी. एम. पाटील यांच्यासमोर या अर्जावर सुनावणी झाली. यावेळी सरकारी पक्षाच्यावतीने विशेष सरकारी वकील उमेशचंद्र यादव पाटील तसेच फिर्यादीचे वकील सचिन पटेकर यांनी न्यायालयात बाजू मांडली. रेखा जरे यांना पाथर्डी तालुक्यातील करंजी घाटामध्ये मारण्याचा कट रचला होता तेव्हा पवार याचे व इतर आरोपींचे फोन झाले आहेत. पवार याचे इतर आरोपीसोबत संबंध होते. त्याने वेळोवेळी फोन करून कटातील इतर आरोपींना माहिती दिली. त्यामुळे पवार याची इतर आरोपीसोबत मिलीभगत असल्याचे दिसून येते, असा युक्तिवाद सरकारी पक्षाकडून करण्यात आला. सदरचा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपी पवार याचा जामीन अर्ज नामंजूर केला आहे.

Web Title: Rekha Jare massacre