रतनगड किल्ल्याला लावला सागवानी दरवाजा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:28 IST2021-02-05T06:28:47+5:302021-02-05T06:28:47+5:30
सह्याद्री प्रतिष्ठानने लावलेला हा तेरावा दरवाजा आहे. या सोहळ्यासाठी संपुर्ण महाराष्ट्रातून सह्याद्रीचे दुर्गसेवक उपस्थित होते. सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणाला ...

रतनगड किल्ल्याला लावला सागवानी दरवाजा
सह्याद्री प्रतिष्ठानने लावलेला हा तेरावा दरवाजा आहे. या सोहळ्यासाठी संपुर्ण महाराष्ट्रातून सह्याद्रीचे दुर्गसेवक उपस्थित होते. सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणाला भंडारा उधळताना दुर्गसेवकांचा आनंद गगनात मावत नव्हता. या सोहळ्यासाठी प्रमुख अतिथी म्हणून गिरीशजी मालपाणी आणि त्यांच्या धर्मपत्नी सोनाली मालपाणी उपस्थित होत्या.
सह्याद्री प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष श्रमीकभाऊ गोजमगुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि दुर्गसंवर्धन अध्यक्ष गणेश रघुवीर यांच्या आणि नगर जिल्ह्यातील सर्व दुर्गसेवकांचे यासाठी सहकार्य लाभले.
यामध्ये शंकर शिंदे, धनंजय काळे, संतोष गजे, भूषण पवार, दिलीप सोनवणे, राजभाऊ सोनवणे, ऋषिकेश कानकाटे, अभय शिरसाठ, प्रतीक शिरसाठ, बाबसाहेब क्षीरसागर, दीपक बिडवे, पुंजाराम भागवत, गिरीश मोरे,संदीप शिंदे, धनंजय कुताळ, विनायक वाडेकर इत्यादी दुर्गसेवकांनी महत्वाची भूमिका बजावली.
...
०३अकोले प्रवेशव्दार
...
ओळी-अकोले तालुक्यातील रतनगड किल्ल्याला नगर येथील सह्याद्री प्रतिष्ठानने बसविलेला सागवानी दरवाजा.