पोलीस ठाण्यात राडा,

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 04:20 IST2021-04-25T04:20:08+5:302021-04-25T04:20:08+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क अहमदनगर : एकमेंकांविरूद्ध मारहाणीची तक्रार देण्यासाठी आलेल्या दोन गटांनी पोलीस ठाण्यातच मारहाण करत राडा केल्याने ...

Radha at the police station, | पोलीस ठाण्यात राडा,

पोलीस ठाण्यात राडा,

लोकमत न्यूज नेटवर्क

अहमदनगर : एकमेंकांविरूद्ध मारहाणीची तक्रार देण्यासाठी आलेल्या दोन गटांनी पोलीस ठाण्यातच मारहाण करत राडा केल्याने सहाजणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शुक्रवारी बारा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.

याप्रकरणी पोलीस नाईक ए. बी. तरटे यांनी फिर्याद दिली असून, रमेश नारायण शेळके, विकास रमेश शेळके, सुनीता रमेश शेळके (तिघे रा. बोल्हेगाव) व दुसऱ्या गटाचे विमल बाबासाहेब हापसे, दीपक बाबासाहेब हापसे, योगेश बाबासाहेब हापसे (रा. रेणुकानगर, बोल्हेगाव) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेळके व हापसे गटात शुक्रवारी वाद झाला. या वादातून दोन्ही गट फिर्याद देण्यासाठी पोलीस ठाण्यात आले. पोलीस ठाण्यात आल्यानंतरही दोन्ही गटात वाद झाल्याने पोलिसांनी तो सोडवला. परंतु, पोलीस ठाण्याच्या आवारात वाद घालून कायदा, सुव्यवस्थेचा भंग केल्याप्रकरणी पोलिसांनी दोन्ही गटांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Radha at the police station,