शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये ९२.८९% मतदानाचे रहस्य! ९० लाख मतदारांची नावे कापल्याचा परिणाम; 'व्होटर बेस' घटल्याने टक्केवारी वाढली?
2
Latest Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
3
४ दिवसांमध्ये ₹९६०० नं स्वस्त झाली चांदी; सोन्याचे दर १७०० रुपयांनी घसरले; पटापट चेक करा आजचे दर
4
‘या’ क्रिकेटपटूविना निम्म्याने घटली मुंबई इंडियन्सची ताकद, फलंदाजांचं पितळ पडलं उघडं 
5
इराण युद्ध थांबवायचे की सुरु करायचे...! ट्रम्प यांच्याकडे फक्त ७ दिवस! '१ मे' पूर्वी मोठा निर्णय घेण्याची शक्यता
6
घटस्फोटाआधी दुसरा विवाह मोठा गुन्हा नाही; आरपीएफ कर्मचाऱ्याला हायकोर्टाचा दिलासा
7
देशातील बँकिंग सेक्टरवर 'Mythos' चे सावट; नेमका काय धोका? अर्थमंत्र्यांनी दिला इशारा...
8
E-Bike: ई-बाईक आहे? ऑफिसला जातानाही व्हा मालामाल... 
9
Gautam Adani News: गौतम अदानी १०० अब्ज डॉलरच्या क्लबमध्ये सामील; मुकेश अंबानींना टाकलं मागे
10
Mumbai University: प्रश्नपत्रिका फूटप्रकरणी शिपायावर गुन्हा दाखल, तीन कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस; एक बडतर्फ 
11
बंगालमध्ये पहिल्या टप्प्यातील १५२ पैकी भाजपा किती जागा जिंकणार? अमित शाहांनी थेट आकडाच सांगितला
12
आता फक्त ५ मिनिटांत होणार ब्रेस्ट कॅन्सरचे निदान; 'केईएम'मध्ये अत्याधुनिक मशिन दाखल!
13
मुंबई, महाराष्ट्राचा Video शेअर करत इराणने अमेरिकेला फटकारले; ट्रम्प यांना दिला मोठा सल्ला!
14
मोबाईल फक्त निमित्त! तुमची ऊर्जा गुपचूप चोरणाऱ्या 'या' छुप्या गोष्टी तुम्हाला माहितीय का?
15
दोन दिवसांवर आलेल्या लग्नासाठी घेतलेल्या ३० साड्या, ६० हजार खाक; ४ तोळे सोने गायब
16
बीड कारागृहात राजकीय ड्रामा! वाल्मीक कराड गँगकडून मारहाणीचा आरोप अन् 'त्या' कैद्याचा 'यू-टर्न'
17
'विशाल पाटलांना तिकीट मिळणार नाही हे जयंत पाटील-विश्वजित कदमांना माहीत होतं"; पडळकरांचा मोठा गौप्यस्फोट
18
युद्धाची तयारी की ढासळणारी अर्थव्यवस्था? रशियानं २२ टन सोने विकले; जागतिक बाजारपेठेत खळबळ
19
अमेरिकेच्या युद्धनौकेवर अचानक माकडाने हल्ला चढवला; होर्मुझच्या मोहिमेवर निघालेले...
20
तुमच्या घरात तुळशीच्या बाजूला ‘या’ गोष्टी ठेवल्या नाही ना? लक्ष्मी नाराज होईल, निघून जाईल!
Daily Top 2Weekly Top 5

मयत सभासदांच्या वारसांना मयत निधीची तरतूद करावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:16 IST

या मागणीचे निवेदन सोसायटीचे सचिव स्वप्नील इथापे यांना देण्यात आले. यावेळी सोसायटीचे संचालक अप्पासाहेब शिंदे, बाबासाहेब बोडखे, महेंद्र हिंगे, ...

या मागणीचे निवेदन सोसायटीचे सचिव स्वप्नील इथापे यांना देण्यात आले. यावेळी सोसायटीचे संचालक अप्पासाहेब शिंदे, बाबासाहेब बोडखे, महेंद्र हिंगे, वसंत खेडकर, सभासद अर्जुन भुजबळ, श्रीराम खाडे, दत्तात्रय कसबे आदी उपस्थित होते. माध्यमिक शिक्षक सोसायटीच्या कार्यकारी मंडळाची सभा दि. २७ जून रोजी होणार आहे. माध्यमिक शिक्षक सोसायटीचे अनेक सभासद कोरोना व इतर कारणांनी मयत झाले आहेत. मयत सभासदांच्या घरातील कुटुंबाचा मुख्य उत्पन्नाचा व उदरनिर्वाहाचा मार्ग बंद झालेला आहे. काही सभासदांना पेन्शनही लागू नाही. शासनाची पीएफची रक्कम काढण्याची बीडीएस प्रणाली बंद आहे. सध्या कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर पगाराव्यतिरिक्त इतर कोणतेही फरक बिल मिळण्यासाठी शासकीय अनुदान उपलब्ध नाही. त्यामुळे मयत बंधू-भगिनींचे कोणत्याही स्वरूपाचे फरक बिले मिळणे आता तरी शक्य नाही. मयतांच्या घरातील इतर सदस्यांचा सांभाळ करणे त्यांच्या दृष्टीने फार जिकिरीचे काम बनले आहे. त्यामुळे या सर्व बाबींचा विचार करून मयत सभासद जेव्हापासून सेवेत हजर झाले, तेव्हापासूनची कायम ठेव, शेअर्स, वर्गणी सोसायटीकडे जमा आहे. सर्वांची ती हक्काची रक्कम त्यांना त्वरित मिळणे गरजेचे असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

सोसायटीने अनावश्यक खर्च न करता व इतर अनावश्यक खर्च टाळून मयतांच्या वारसांना मयत निधीची तरतूद करण्याच्या मागणीचे निवेदन परिवर्तन मंडळाच्या वतीने माध्यमिक शिक्षक सोसायटीत देण्यात आले.

---------------

फोटो - १९सोसायटी

माध्यमिक शिक्षक सोसायटीच्या मयत कर्मचारी सभासदांना त्यांच्या हक्काची शेअर्स, कायमठेव व वर्गणीची रक्कम द्यावी या मागणीचे निवेदन परिवर्तन मंडळाच्या वतीने विरोधी संचालक व सभासदांनी सोसायटीचे सचिव स्वप्नील इथापे यांना दिले.