शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
4
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
5
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
6
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
7
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
8
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
9
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
10
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
11
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
12
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
13
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
14
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
15
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
16
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
17
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
18
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
19
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
20
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

इंधन दरवाढीविरोधात निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:32 IST

अहमदनगर : घरगुती गॅस, पेट्रोल व डिझेल इंधन दरवाढीच्या निषेधार्थ जनआधार सामाजिक संघटनेच्या वतीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात ...

अहमदनगर : घरगुती गॅस, पेट्रोल व डिझेल इंधन दरवाढीच्या निषेधार्थ जनआधार सामाजिक संघटनेच्या वतीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. पेट्रोल, डिझेलवरील सर्व कर माफ करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.

या आंदोलनात संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश पोटे, शहराध्यक्ष शहानवाज शेख, जिल्हाध्यक्ष अमोल भंडारे, युवक अध्यक्ष शहेबाज शेख, भिंगार शहराध्यक्ष अजय सोलंकी, प्रमोद ठाकूर, संतोष उदमले, मीजान कुरेशी, श्रीपाद वाघमारे, संतोष त्रिंबके, लक्ष्मण साळे, बाबासाहेब त्रिंबके, वसीम शेख, गणेश निमसे आदी सहभागी झाले होते.

देशात पेट्रोल महागाईचे शतक पूर्ण करीत आहे. दिवसेंदिवस डिझेल व घरगुती गॅसचे दर वाढत आहेत. अनेक सर्वसामान्य नागरिकांचा कोरोनामुळे रोजगार हिरावला गेला आहे. तर अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. दिवसेंदिवस महागाई वाढत असताना सर्वसामान्यांचा उदरनिर्वाहाचा प्रश्‍न बिकट बनला आहे. मागील काळात क्रूड ऑइलचा भाव ११० ते १२५ प्रतिडॉलर असतानादेखील पेट्रोल ८० आणि डिझेल ७० रुपये प्रतिलिटर होते. जागतिक क्रूड ऑइलचा दर हा ६० ते ७० रुपये प्रतिडॉलर असतानाही केंद्र शासनाने लावलेल्या जास्तीत जास्त करांमुळे सर्वच पेट्रोलियम पदार्थ महाग झाले आहेत. त्याचा सर्वात मोठा फटका सर्वसामान्य जनतेला बसत आहे, असे निवेदनात म्हटले आहे. दरवाढ आटोक्यात न आल्यास आठ दिवसांनी महामार्गावर रास्ता रोको करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

-----------

फोटो- साजीद

घरगुती गॅस, पेट्रोल व डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ जनआधार सामाजिक संघटनेच्या वतीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.