शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

दगडाला दुधाचा अभिषेक घालत सरकारचा निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:15 IST

दूध उत्पादक शेतकी संघर्ष समिती, किसान सभा व इतर समविचारी शेतकरी संघटनांनी विविध मागण्यांसाठी राज्यभर आंदोलन सुरू केले आहे. ...

दूध उत्पादक शेतकी संघर्ष समिती, किसान सभा व इतर समविचारी शेतकरी संघटनांनी विविध मागण्यांसाठी राज्यभर आंदोलन सुरू केले आहे. या पार्श्वभूमीवर मंगळापूर गावात दगडाला दुधाचा अभिषेक घालत आंदोलन करण्यात आले. ॲड. दीपक वाळे, सोमनाथ भोकनळ, भानुदास गोरे, रमेश पवार, समीर वाळे, शिवाजी वाळे, राधू भोकनळ, नवनाथ भोकनळ, रावसाहेब वाळे, सोमेश्वर भोकनळ, भाऊसाहेब वाळे, योगेश भोकनळ, रामदास घुले, शुभम वाळे, गेणू पवार, भानू भोकनळ, मच्छिंद्र पवार, चंद्रभान भोकनळ, नामदेव पवार आदी या आंदोलनात सहभागी झाले होते.

लॉकडाऊनचा गैरफायदा घेत दूध उत्पादक शेतकऱ्यांची सहकारी व खासगी दूध संघांकडून लूटमार करण्यात आली. लॉकडाऊन काळात मागणी घटल्याचे कारण देत दूध संघांनी दूध खरेदीचे दर १० ते १५ रुपये प्रति लिटरने पाडले; मात्र ग्राहकांसाठी विक्रीदर तसेच ठेवत शेतकरी व ग्राहकांची प्रचंड लूटमार केली आहे. ज्या दूध संघांनी दूध खरेदीचे दर पाडले, त्या सर्व दूध संघाचे ऑडिट करा. प्रत्यक्षात दुधाची मागणी किती घटली होती व त्या प्रमाणात किती दर कमी देण्यात आला. याबाबत सखोल चौकशी करावी. परिस्थितीचा गैरफायदा घेऊन शेतकऱ्यांची लूटमार करणाऱ्या दूध संघावर कठोर कारवाई करावी. साखर व्यवसायाप्रमाणेच दूध व्यवसायाला किमान आधारभावासाठी एफआरपी व शिल्लक मिळकतीत हक्काच्या वाट्यासाठी रेव्हेन्यू शेअरींग असे कायदेशीर दुहेरी संरक्षण करा. आदी मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या आहेत.

फोटो नेम : १७० मंगळापूर आंदोलन, ओळ : संगमनेर तालुक्यातील मंगळापूर गावात दगडाला दुधाचा अभिषेक