संगमनेरात जुगार अड्ड्यावर छापा, सात जण ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2019 12:17 IST2019-10-06T12:17:14+5:302019-10-06T12:17:23+5:30

संगमनेर शहरातील रहमत नगर परिसरात जुगार सुरू असलेल्या ठिकाणी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अभय परमार यांच्या पथकाने कारवाई केली. या कारवाईत सात जणांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडील १६ हजार २२० हजारांचा मुद्देमाल व जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले.

Print a gambling base at the confluence | संगमनेरात जुगार अड्ड्यावर छापा, सात जण ताब्यात

संगमनेरात जुगार अड्ड्यावर छापा, सात जण ताब्यात

संगमनेर : शहरातील रहमत नगर परिसरात जुगार सुरू असलेल्या ठिकाणी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अभय परमार यांच्या पथकाने कारवाई केली. या कारवाईत सात जणांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडील १६ हजार २२० हजारांचा मुद्देमाल व जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले. शनिवारी रात्री सव्वा बाराच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. 
 वसीम मोईन शेख (वय ३०), अकिल हसन सय्यद (वय ३२), शोएब खान मोहम्मद शेख (वय ३२), अजहर अन्सार पठाण (वय ३२) (सर्व रा.नाईकवाड पुरा, संगमनेर), अरबाज नूर मोहम्मद शेख (वय २०, रा.एकता नगर, संगमनेर), कलीम करीम शेख (वय २६), काशीम सय्यद इक्बाल (वय २९) (दोघेही रा. रहमत नगर, संगमनेर) अशी गुन्हा दाखल झालेल्या सात जणांची नावे आहेत. पोलीस नाईक सचिन उगले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.  पोलीस नाईक आरवडे तपास करीत आहेत. 

Web Title: Print a gambling base at the confluence