अहिल्यानगरमध्ये रेल्वेतच गर्भवतीची प्रसूती! आरपीएफकडून ऑपरेशन मातृशक्ती यशस्वी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2026 00:47 IST2026-05-12T00:46:32+5:302026-05-12T00:47:27+5:30

रेल्वे प्रवासादरम्यान एका गर्भवती महिला प्रवाशाला सुरक्षित प्रसूतीसाठी मदत

Pregnant woman delivers child on train in Ahilyanagar Operation Matru Shakti by RPF | अहिल्यानगरमध्ये रेल्वेतच गर्भवतीची प्रसूती! आरपीएफकडून ऑपरेशन मातृशक्ती यशस्वी

अहिल्यानगरमध्ये रेल्वेतच गर्भवतीची प्रसूती! आरपीएफकडून ऑपरेशन मातृशक्ती यशस्वी

योगेश गुंड 

अहिल्यानगर: प्रवासी सेवेबाबत असलेल्या माणुसकी आणि समर्पणाचे एक हृदयस्पर्शी उदाहरण म्हणून, मध्य रेल्वेच्या रेल्वे संरक्षण दलाच्या (आरपीएफ) जवानांनी 'ऑपरेशन मातृशक्ती' अंतर्गत रेल्वे प्रवासादरम्यान एका गर्भवती महिला प्रवाशाला सुरक्षित प्रसूतीसाठी मदत केली.

पुणे-सुपौल एक्स्प्रेसमध्ये शनिवारी ही घटना (दि. ९) घडली. कोचमधून रोक्साना खातून (२८, रा. उत्तर प्रदेश) या पती जमिल बेलावर यांच्यासोबत प्रवास करीत होत्या.

रेल्वेबाबत कृतज्ञता

आरपीएफ कर्मचाऱ्यांच्या तत्पर मदतीने आणि माणुसकीच्या वृत्तीने भावुक झालेल्या कुटुंबीयांनी रेल्वे सुरक्षा दल आणि रेल्वे प्रशासनाप्रती कृतज्ञता व्यक्त केली. 'ऑपरेशन मातृशक्ती' अंतर्गत केलेली ही न कौतुकास्पद कृती भारतीय रेल्वेचा काळजीवाहू आणि मानवतावादी चेहरा दर्शवते. प्रवासी सुरक्षा, आपत्कालीन मदत व मानवसेवेप्रती आरपीएफ, पुणे विभागाची वचनबद्धता या घटनेने अधोरेखित केली.

तत्काळ वैद्यकीय मदत हजर

प्रवासादरम्यानच त्यांना तीव्र प्रसूतिवेदना जाणवू लागल्या. याबाबतची माहिती मिळताच, अहिल्यानगर पोस्टचे आरपीएफ कर्मचारी, कॉन्स्टेबल सोमनाथ पाठाडे, हेडकॉन्स्टेबल विश्वजित काकडे तत्काळ मदतीसाठी कोचकडे धावले. संवेदनशील परिस्थिती असतानाही आरपीएफ जवानांनी जबाबदारीने आपले कर्तव्य निभावले.

प्रवासादरम्यानच महिलेने ट्रेनमध्ये एका २ बाळाला जन्म दिला. नंतर आरपीएफ कर्मचाऱ्यांनी आई व नवजात बाळाला डब्यातून सुरक्षित बाहेर काढले. स्टेशन प्रशासनाच्या मदतीने तत्काळ १०८ रुग्णवाहिकेची व्यवस्था केली. सध्या आई व नवजात बाळाची तब्येत व्यवस्थित असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

Web Title : अहिल्यानगर में ट्रेन में प्रसव: आरपीएफ का 'ऑपरेशन मातृशक्ति' सफल

Web Summary : अहिल्यानगर में, आरपीएफ टीम ने एक गर्भवती महिला को ट्रेन में बच्चे को जन्म देने में मदद की। 'ऑपरेशन मातृशक्ति' ने सुरक्षित प्रसव और तत्काल चिकित्सा देखभाल सुनिश्चित की। माँ और बच्चा दोनों स्वस्थ हैं, परिवार ने आरपीएफ को उनकी त्वरित सहायता के लिए आभार व्यक्त किया।

Web Title : Railway Delivery in Ahilyanagar: RPF's 'Operation Matrushakti' a Success

Web Summary : In Ahilyanagar, an RPF team assisted a pregnant woman deliver a baby on a train. The 'Operation Matrushakti' ensured safe delivery and immediate medical care. Both mother and child are healthy, with the family expressing gratitude to the RPF for their prompt assistance.