आॅनलाइन लोकमतअहमदनगर, दि़ २९ - शहरातील तेलीखुंट परिसरात दोन गटात शुक्रवारी (दि.२८) रात्री ११ वाजण्याच्या सुमारास तुफान दगडफेक झाली. मात्र, या घटनेचे कारण समजू शकले नाही़दगडफेकीमुळे तेलीखुंट चौकात दगड, काचेच्या बाटल्यांचा खच साचला होता़ घटनेची माहिती मिळाल्यानंतर सहाय्यक पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित यांनी पोलीस फौजफाट्यासह तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. दंगल नियंत्रण पथकही दाखल झाले. त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणली. अचानक उडालेली धावपळ, आरडाओरड, दगडफेकीमुळे गोंधळात भर पडली. हा प्रकार नेमका का घडला, हे मात्र समजू शकले नाही. या दगडफेकीत तीन दुकानांचे नुकसान झाल्याचे पोलिसांनी सांगितले़ या दगडफेकीमुळे तेलीखुंट परिसराला पोलीस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते़
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}