राज्यस्तरीय युवा शिबिरात ११ विद्यार्थ्यांचा सहभाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:21 IST2021-07-28T04:21:26+5:302021-07-28T04:21:26+5:30

कोपरगाव : शहरातील के. जे. सोमैया वरिष्ठ व के. बी. रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयाच्या ११ विद्यार्थ्यांनी गांधी रिसर्च फाउंडेशन, जळगाव ...

Participation of 11 students in state level youth camp | राज्यस्तरीय युवा शिबिरात ११ विद्यार्थ्यांचा सहभाग

राज्यस्तरीय युवा शिबिरात ११ विद्यार्थ्यांचा सहभाग

कोपरगाव : शहरातील के. जे. सोमैया वरिष्ठ व के. बी. रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयाच्या ११ विद्यार्थ्यांनी गांधी रिसर्च फाउंडेशन, जळगाव द्वारा ‘गांधी विचार शृंखला अंतर्गत महाविद्यालयीन युवकांसाठी आयोजित राज्यस्तरीय ऑनलाईन शिबिरात सहभागी झाले होते. या चार दिवसीय शिबिरातील व्याख्यानाचा लाभ घेत मुक्त चर्चेत सहभाग नोंदविल्याची माहिती प्राचार्य डॉ. बी. एस. यादव यांनी येथे दिली.

या ऑनलाईन शिबिरात गौरी दिवटे, योगेंद्र मुळे, आलिया सय्यद, अक्षय रटनालू, रेणुका हलवाई, वैभव बिडवे, लिना येवले, योगेश भामरे, प्रीतम साळी, मंगेश गुंजाळ, नामदेव कुदनर या विद्यार्थ्यांनी शिबिरात सहभाग नोंदविला. या शिबिरात अहमदाबाद येथील गुजरात विद्यापीठाचे डॉ. सुदर्शन अय्यंगर, डॉ. विरल देसाई व तुषार गांधी यांची ‘आजचा युवक व महात्मा गांधीजींचे विचार ’ या संदर्भात व्याख्याने झाली. अध्यक्ष अशोक रोहमारे, सचिव ॲड. संजीव कुलकर्णी, संदीप रोहमारे, डॉ. अभिजीत नाईकवाडे यांनी कौतुक केले.

Web Title: Participation of 11 students in state level youth camp