बंदी असतानाही बैलगाडा शर्यतीचे आयोजन; ४७ जणांवर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 04:26 IST2021-08-17T04:26:41+5:302021-08-17T04:26:41+5:30

कोरोना प्रादुर्भावामुळे जमावबंदी व शर्यतीवरील बंदीचे नियम धाब्यावर बसवून कौठे मलकापूर देवी मंदिरासमोर बैलगाडा शर्यत घेण्यात आली. या शर्यतीची ...

Organizing bullock cart races despite the ban; Charges filed against 47 persons | बंदी असतानाही बैलगाडा शर्यतीचे आयोजन; ४७ जणांवर गुन्हा दाखल

बंदी असतानाही बैलगाडा शर्यतीचे आयोजन; ४७ जणांवर गुन्हा दाखल

कोरोना प्रादुर्भावामुळे जमावबंदी व शर्यतीवरील बंदीचे नियम धाब्यावर बसवून कौठे मलकापूर देवी मंदिरासमोर बैलगाडा शर्यत घेण्यात आली. या शर्यतीची माहिती घारगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांना मिळाल्यानंतर पोलीस उपनिरीक्षक धीरज राऊत, पोलीस हवालदार सुरेश टकले, दशरथ वायाळ, विशाल कर्पे यांनी कौठे मलकापूर येथे धाव घेतली. पोलीस आल्याचा सुगावा लागताच शर्यत पाहण्यासाठी आलेल्यांनी तेथून पोबारा केला. यावेळी पोलिसांनी घटनास्थळावरून एक पिकअप (एम.एच.१४, एफ. टी. ०७००), दोन बैलांची जोड, बैलगाडा शर्यतीचा छकडा, बैलाला पळविण्याकरिता टोचण्यासाठी खिळा असलेली पातळ बांबूची काठी असा सहा लाख दहा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. नितीन उत्तम पावडे (वय ३८, रा. पाचघर, ता. जुन्नर, जि. पुणे), नितीन उत्तम धोंडकर (२२, रा. पाचघर, ता. जुन्नर, जि. पुणे), अक्षय बबन डुबरे (वय २६, रा. ओतुर, राज लॉन्स), श्रीकांत बाळू मंडलिक(२७, रा. डिंगोर, ता. जुन्नर, जि. पुणे), शिवाजी रामभाऊ कारंडे (५३), सचिन उत्तम पानसरे (२६, रा. ओतुर, ता. जुन्नर, जि. पुणे) या सहाजणांना ताब्यात घेतले.

बैलगाडा शर्यत आयोजक लक्ष्मण गजाबा गिते (रा. कौठे, मलकापूर ता. संगमनेर), राकेश खैरे, सुरेश लक्ष्मण चितळकर (साकुर, ता. संगमनेर), बाळासाहेब बबन महाकाळ (रा. मांदारणे, ता. जुन्नर, जि. पुणे), राहुल काळे (पाचघर रोड, ओतुर), संजय भागा देवकाते (रा. चितळकर वस्ती, साकुर, ता. संगमनेर), चैतन्य पडवळ (रा. ओतुर, राज लॉन्स), सतीश गिरजू खेमनर (रा. बिरेवाडी), भाऊसाहेब आबू खेमनर (रा. हिरेवाडी), दादासाहेब चिमाजी खेमनर, (रा. हिरेवाडी), विशाल सगाजी खेमनर (रा. नान्नर वस्ती), शुभम शंकर नान्नर (रा. नान्नर वस्ती), अमोल साहेबराव नान्नर (नान्नरवस्ती), बाळू साहेबराव कुदनर (शिंदोडी), प्रतीक संतोष ठोंबरे (रा. जांबुत), राहुल गंभिरे (रा. कौठेमलकापूर, ता. संगमनेर) यांसह इतर २० ते २५ घारगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस कॉन्स्टेबल विशाल कर्पे यांनी फिर्याद दाखल केली आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल सुरेश टकले हे करीत आहेत.

Web Title: Organizing bullock cart races despite the ban; Charges filed against 47 persons