श्रीगोंदा : महामानव बाबा आमटे संस्थेतील बहुतांशी मुले कोरोना महामारीमुळे स्वत:च्या पालावर गेली आहेत. दीड वर्ष झाले तरी शाळा सुरू नाहीत. मात्र ऑनलाइन शिक्षणापासून दूर असलेल्या मुलांच्या हाती मोबाइल आला आणि पालावरच ऑनलाइन अभ्यासाचा आनंद ही मुले लुटू लागली आहेत. तालुक्यातील एकूण ३५ विद्यार्थी या माध्यमातून शिक्षण घेत आहेत.
कोरोनामुळे शाळा बंद झाल्या आणि आदिवासी मुलांच्या शिक्षणाचा खेळखंडोबा झाला. मोबाइल, लॅपटॉप नसल्याने ऑनलाइन शिक्षण आदिवासींच्या पालावर पोहोचलेच नाही. महामानव बाबा विकास संस्थेचे अध्यक्ष अनंत झेंडे यांनी सामाजिक कार्यकर्त्यां दिव्या पद्मनाभ यांनी कोटक बँकेचे टी.व्ही. सुधाकर यांच्या माध्यमातून आदिवासी मुलांना ऑनलाइन शिक्षणासाठी २ लॅपटॉप आणि ४ टॅबची मदत केली. पालावर विजेची सोय नसल्याने त्यासाठी पॉवर बँक दिली. त्यांनी एकूण एक लाख रुपयांची मदत दिला.
दोन लॅपटॉप आणि चार मोबाइल टॅबच्या माध्यमातून साधारणपणे ३५ विद्यार्थ्यांची ऑनलाइन शाळा सुरू केली आहे.
१ जुलै २०२१ पासून ही शाळा सुरू आहे. शिवाय ज्या विद्यार्थ्यांना लॅपटॉप दिले आहेत. त्यांचे कॉम्प्युटर क्लास सुरू आहेत. ऑनलाइन क्लासेस कधी सुरू होतील की नाही, अशी चिंता असणाऱ्या आदिवासी मुलांना टॅब आणि लॅपटॉप मिळाल्यावर त्यांचे शिक्षण सुरू झाले.
----
काही दिवसातच मुले झाली टेक्नोसॅव्ही..
अगदी काही दिवसातच ही मुले टेक्नोसॅव्ही झाली आहेत. मोबाइल, टॅब, लॅपटॉप व्यवस्थितरित्या हाताळू लागली आहेत. झूम आणि गूगल मीटचा वापर आता सर्व मुले करू लागली आहेत. काही नवीन माहिती हवी असल्यास विकीपीडियावर ते माहिती शोधतात.
---
२९ श्रीगोंदा आदिवासी
श्रीगोंदा येथील आदिवासी समाजातील पालावर टॅबच्या समोर बसून ऑनलाइन शिक्षण घेणारी मुले.