शहरं
Join us  
Trending Stories
1
तुरुंगात असूनही भोंदू अशोक खरातला जॅकपॉट; सिंहस्थ रिंगरोड भूसंपादनातून ३ कोटी मिळणार
2
दोन देशात जीवघेण्या विषाणूचा कहर, WHO अलर्टवर, घोषित केली हेल्थ इमर्जन्सी
3
आजचे राशीभविष्य - १७ मे २०२६, नोकरी - व्यवसायातील वातावरण आपणास अनुकूल राहील
4
आनंदवार्ता ! मान्सून अंदमान, निकोबारमध्ये दाखल; महाराष्ट्रात कधी एन्ट्री? 
5
हे दशक आपत्तींचे; ...तर गरिबीच्या खाईत अडकू; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा इशारा
6
मुलीसाठी पाच लाखांत पेपर विकत घेतला? सीबीआयकडून नांदेडात पालकांची चौकशी 
7
प्रा. मनीषा मांढरे सीबीआयच्या जाळ्यात; पुण्यातील तिसरी अटक
8
साक्रीत दुहेरी हत्याकांड; भोंदू बाबा गजाआड, अघोरी पूजेतून वाद झाल्याने हत्या करून मृतदेह पुरले
9
‘कारकुनी चुकी’मुळेच गोंधळ; पटेल, तटकरे पदावर कायम; अजित पवार गट आता निवडणूक आयोगाला नव्याने पत्र पाठवणार
10
टीईटी पेपरफुटी प्रकरण ‘तारीख पे तारीख’मध्ये अडकले; सर्व आरोपी आता जामिनावरही सुटले 
11
हवामान बदलामुळे भारतासह जगभरातील नद्यांतील ऑक्सिजनच्या प्रमाणात वेगाने घट
12
धर्मादाय आयुक्तांच्या हस्तक्षेपानंतर टाटा ट्रस्टची महत्त्वाची बैठक स्थगित
13
एक विधान अन् इस्रायल, यूएई गुप्त मैत्रीचा पर्दाफाश!
14
आम्ही दोघेच जगाचे महान नेते; दौरा ऐतिहासिक म्हणत ट्रम्प यांनी जिनपिंग भेटीचे ‘जी-२’ असे केले नामकरण
15
‘वॉरंट’ काढलं, पण DSP सिराजला 'अरेस्ट' करायला नाही जमलं; फिन ॲलनचा धुमाकूळ, शतक थोडक्यात हुकलं!
16
मातृत्वाला सलाम! स्वतः होरपळली, पण काळजाच्या तुकड्यांना वाचवलं; मन हेलावून टाकणारी घटना
17
ब्लूटूथ इयरबड्समुळे ब्रेन कॅन्सर होतो? तज्ज्ञांचा मोठा खुलासा, वापरताना 'अशी' घ्या काळजी
18
'माझ्याविषयी गैरसमज पसरवले...'; मराठा भवनासाठी जागा दिल्यानंतर मुंडेंचे विरोधकांना उत्तर
19
नोटांचे बंडल, दागिने, आलिशान फ्लॅट; इंजिनिअरकडे सापडलं कोट्यवधीचं घबाड, ४ ठिकाणी धाड
20
Monsoon in Andaman : आनंदवार्ता! अंदमान-निकोबारमध्ये मान्सून दाखल; 'या' दिवशी केरळमध्ये होणार आगमन
Daily Top 2Weekly Top 5

ऑनलाइन शिक्षण अन्‌ मोबाइलने लावला मुलांना चष्मा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 04:17 IST

कोपरगाव : कोरोनामुळे गेल्या दीड वर्षापासून जनजीवन पूर्णतः विस्कळीत झाले आहे. उद्योग, व्यापार बाजारपेठ यांच्यावर खूप मोठ्या प्रमाणात परिणाम ...

कोपरगाव : कोरोनामुळे गेल्या दीड वर्षापासून जनजीवन पूर्णतः विस्कळीत झाले आहे. उद्योग, व्यापार बाजारपेठ यांच्यावर खूप मोठ्या प्रमाणात परिणाम झाला. शाळा, महाविद्यालय तर बंदच आहे. ऑफलाइन शिक्षण थांबले असले तरी मोबाइल, संगणकांमुळे इयत्ता पहिली ते पदवीपर्यंतचे तासन‌्तास ऑनलाइन शिक्षण थांबलेले नाही. मात्र, अशाप्रकारे शिक्षण घेताना या उपकरणाच्या जास्त वापरामुळे मुलांच्या डोळ्याच्या तक्रारी वाढून चष्मा लागत आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर लहान मुले आणि युवकांच्या डोळ्यांच्या समस्येत वाढ झाल्याचे दिसत आहे. संगणक आणि मोबाइलच्या अतिवापरामुळे मुलांमध्ये डोकेदुखी, डोळ्यांतून पाणी येणे असे प्रकार वाढत आहेत. परंतु, शिक्षणासाठी सध्या तरी ऑनलाइन शिक्षण एवढाच पर्याय असल्याने सर्वत्र याचा सर्रास वापर सुरू झाला. गेल्या वर्षी सुरुवातीच्या काळात शाळा बंद असल्याने मुलांचे ऑफलाइन शिक्षण पूर्णपणे बंद झाले होते. यामुळे पालक देखील चिंतेत होते. त्यावर पर्याय म्हणून ऑनलाइन शिक्षण सुरू झाले. सुरुवातीला हा पर्याय चांगला राहिला, मात्र आता यामुळे मुलांच्या डोळ्यांसंदर्भातील तक्रारी समोर येऊ लागल्या आहे. त्यामुळे अनेक पालकांच्या चिंतेत वाढ झाली आहे.

...............

डोळ्यांना त्रास होऊ नये यासाठी हे करा

अ ) ॲंटी ग्लेयर चष्मा वापरावा.

ब ) संगणक स्क्रीनवर ॲंटी ग्लेयर ग्लास बसवावी.

क ) प्रत्येक ऑनलाइन तासिकेनंतर डोळे बंद ठेवून डोळ्यांना थोडा आराम द्यावा.

ड ) मोबाइल किंवा संगणकाचा वापर होताना एक तासानंतर १० ते १५ मिनिटे बाजूला व्हावे.

.........

लहान मुलांना आहेत हे धोके ...

सतत मोबाइल आणि संगणक वापरल्याने लहान मुलांना डोळे कोरडे पडणे, डोळ्यांची आग होणे, डोळे लाल होणे, डोळ्यांच्या नसांवर ताण येणे व यातून पुढे चालून डोळ्यांना नंबर येऊन भविष्यात हा नंबर आणखी वाढू शकतो.

.............

कोरोनामुळे ऑनलाइन शिक्षणाशिवाय इतर दुसरा कुठलाही पर्याय उपलब्ध नाही. त्यामुळे मोबाइल व संगणक यांचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यातून मुलांच्या डोळ्यांच्या समस्या वाढू लागल्या आहे. दैनंदिन डोळ्यासंदर्भातील तक्रारी, डोकेदुखी असलेले शाळकरी मुले तपासणीसाठी येत आहे. त्यासाठी ऑनलाइन शिक्षण सुरू असताना किमान एक तासानंतर १० ते १५ मिनिटे बाजूला होऊन डोळे पाण्याने धुवून घेतल्यास आराम मिळतो. व डोळ्यांच्या तक्रारी कमी होण्यास मदत होते.

- डॉ. आस्था तिरमखे, नेत्ररोग तज्ज्ञ, कोपरगाव

...........

कोरोनामुळे शाळा बंद आहेत. शिक्षणासाठी ऑनलाइन पर्याय उपलब्ध झाला आहे. त्यामुळे मुलांना सतत मोबाइल व संगणकाचा वापर करावा लागत आहे. या वापरातून मुलांच्या डोळ्यांच्या समस्या वाढत आहे. त्यामुळे लवकरात लवकर शाळा सुरू झाल्या तर बरे होईल.

- नसरीन पठाण, महिला पालक