कांद्याचे भाव घसरल्याने आवकही रोडावली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2020 04:17 IST2020-12-25T04:17:15+5:302020-12-25T04:17:15+5:30

आठ दिवसांपूर्वी नगर बाजार समितीत १ लाख १२ हजार गोण्यांपर्यंत (६२ हजार क्विंटल) लाल कांद्याची आवक पोहोचली होती. त्यापूर्वी ...

Onion prices also plummeted due to fall in prices | कांद्याचे भाव घसरल्याने आवकही रोडावली

कांद्याचे भाव घसरल्याने आवकही रोडावली

आठ दिवसांपूर्वी नगर बाजार समितीत १ लाख १२ हजार गोण्यांपर्यंत (६२ हजार क्विंटल) लाल कांद्याची आवक पोहोचली होती. त्यापूर्वी भावही चार हजारांपर्यंत होते; परंतु आवक वाढल्याने पुढच्याच लिलावात भाव अडीच हजार रुपयांपर्यंत खाली आले.

चार दिवसांपूर्वी (सोमवारी) झालेल्या लिलावातही अडीच हजार रुपयांपर्यंतच कांद्याला भाव मिळाला. भाव पडल्याने शेतकऱ्यांनीही कांदा बाजारात आणणे थांबवले आहे. परिणामी, अचानक वाढलेली आवक आता हळूहळू कमी होत आहे. गुरुवारी (दि.२४) झालेल्या लिलावात ३६ हजार ४३३ क्विंटल लाल कांद्याची आवक झाली. त्यामध्ये प्रथम प्रतवारीच्या कांद्याला २,१०० ते २,६०० रुपयांचा भाव मिळाला. गेल्या दहा दिवसांपासून कांद्याला दोन ते अडीच हजार रुपयांपर्यंतच भाव मिळत आहे.

---------------

गुरुवारच्या लिलावातील भाव

(लाल कांदा)

प्रथम प्रतवारी २,१०० ते २,६००

द्वितीय १,४०० ते २,१००

तृतीय ५०० ते १,४००

चतुर्थ ३०० ते ५००

---------------

Web Title: Onion prices also plummeted due to fall in prices