मुळा धरणामध्ये एकाचा मृत्यू, एकाचा जीव वाचविण्यात यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 04:26 IST2021-08-17T04:26:38+5:302021-08-17T04:26:38+5:30

दुपारी १ वाजण्याच्या सुमारास बिरेंदरसिंग रावत (रा. उत्तराखंड), रावसाहेब भिमराज मते (४०, रा. मुलनमाथा, राहुरी बु., ता. राहुरी) यांना ...

One killed in Mula dam, one saved | मुळा धरणामध्ये एकाचा मृत्यू, एकाचा जीव वाचविण्यात यश

मुळा धरणामध्ये एकाचा मृत्यू, एकाचा जीव वाचविण्यात यश

दुपारी १ वाजण्याच्या सुमारास बिरेंदरसिंग रावत (रा. उत्तराखंड), रावसाहेब भिमराज मते (४०, रा. मुलनमाथा, राहुरी बु., ता. राहुरी) यांना पोहण्याचा मोह आवरता आला नाही. काही वेळाने दोघेही पाण्यात गटांगळ्या घेऊ लागले. विकास गंगे व इंद्रजित गंगे यांनी मदतीसाठी धाव घेतली. त्यांनी बिरेंदरसिंग रावत यास पाण्याबाहेर काढले. परंतु रावसाहेब मते हे पाण्यात कोठे गायब झाले हे समजलेच नाही. पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांसह पोलीस उपनिरीक्षक नीरज बोकील, पोलीस हवालदार आण्णासाहेब चव्हाण, संजय जाधव यांनी घटनास्थळी भेट दिली. रविवारी व सोमवारी सलग दोन दिवस मुळा धरणाच्या पाण्यामध्ये छोटी बोट व ट्यूबच्या सहाय्याने रावसाहेब मते यांना शोधण्याचा प्रयत्न झाला. परंतु शोध कार्यामध्ये अपयश आले आहे. अखेर सोमवारी दुपारी ४ च्या सुमारास प्रशासन व पाणबुड्यांनी हताश होऊन शोध कार्य थांबविले. चमोरी विश्रामगृह येथे पाण्याच्या कडेला पाण्यात बुडालेले रावसाहेब मते यांची चप्पल व कपडे पडून होते.

Web Title: One killed in Mula dam, one saved