शहरं
Join us  
Trending Stories
1
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
2
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
3
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
4
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
5
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
6
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
7
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
8
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
9
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
10
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
11
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
12
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
13
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
14
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
15
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
16
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
17
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
18
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
19
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
20
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
Daily Top 2Weekly Top 5

वृक्ष लागवडीसाठी दीड लाख खड्डे

By admin | Updated: June 24, 2016 01:14 IST

अहमदनगर : सरकारी यंत्रणांमार्फत साडेतीन लाख वृक्षांची लागवड करण्यात येणार असून, विविध यंत्रणांकडून दीड लाख खड्डे खोदले आहेत़

अहमदनगर : सरकारी यंत्रणांमार्फत साडेतीन लाख वृक्षांची लागवड करण्यात येणार असून, विविध यंत्रणांकडून दीड लाख खड्डे खोदले आहेत़ या खड्डयांत पुढील महिन्यात होणाऱ्या वृक्ष लागवड सप्ताहात रोपांची लागवड करण्यात येणार आहे़शहरासह जिल्ह्यात पावसाचे आगमन झाले आहेत़ त्यामुळे सर्वांच्याच आशा पल्लवित झाल्या असून, सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे़ पाऊस पडताच जिल्ह्यात वृक्ष लागवड करण्याचे नियोजन सामाजिक वनीकरण विभागाकडून करण्यात आले आहे़ शासनाच्या कृषी, ग्रामविकास, नगरविकास, उद्योग, सहकार व पणन, आरोग्य, सार्वजनिक बांधकाम, जलसंपदा, गृह विभाग, विधी व न्याय, महसूल, कृषी विद्यापीठ, देवस्थान, ऊर्जा, आदिवासी विकास विभाग, शिक्षण व क्रीडा, पशूसंवर्धन, जलसंधारण, केंद्र शासनाचे विभाग आणि अशासकीय संस्थांना जिल्ह्यातील २ लाख ३४ हजार वृक्ष लागवड करण्याचे उद्दिष्ट आहे़ मात्र विविध विभागांकडून आलेली मागणी यापेक्षा अधिक आहे़ शासकीय कार्यालयांनी सामाजिक वन विभागाकडे ३ लाख ६३ हजार ४१४ वृक्षांची मागणी केली आहे़ त्यापैकी १ लाख ६८ हजार ८३१ खड्डेही खोदून झाले आहेत़ उर्वरित १ लाख ९४ हजार खड्डे येत्या आठ दिवसांत खोदण्यात येणार असल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांनी दिली़ जिल्ह्यात १४ लाख वृक्षांची लागवड करण्याचे उद्दिष्ट होते़ त्यात दोन लाखांची वाढ झाली असून, शहरासह जिल्ह्यात १६ लाख वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे़ सरकारी कार्यालयांकडून मोठ्याप्रमाणात वृक्षांची मागणी करण्यात आली आहे़ त्याचबरोबर विविध सामाजिक संस्था, मित्रमंडळ, वृक्षप्रेमींनी वृक्ष लागवडीसाठी सरसावले आहेत़ (प्रतिनिधी)