शहरं
Join us  
Trending Stories
1
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
2
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
3
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
4
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
5
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
6
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
7
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
8
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
9
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
10
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
11
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
12
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
13
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
14
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
15
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
16
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
17
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
18
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
19
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
20
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
Daily Top 2Weekly Top 5

‘साईकृपा’च्या जप्तीची नोटीस

By admin | Updated: February 27, 2016 23:37 IST

अहमदनगर : माजी मंत्री बबनराव पाचपुते यांच्या साईकृपा युनिट २ (हिरडगाव) या कारखान्याला श्रीगोंद्याच्या तहसीलदार वंदना खरमाळे यांनी मालमत्ता जप्तीची नोटीस बजावली आहे.

अहमदनगर : ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे सन २०१४-१५ चे किमान आधारभूत किमतीचे (एफआरपी) ३८ कोटी २५ लाख रुपयांचे देणे थकविल्यामुळे सरकारच्या आदेशानुसार माजी मंत्री बबनराव पाचपुते यांच्या साईकृपा युनिट २ (हिरडगाव) या कारखान्याला श्रीगोंद्याच्या तहसीलदार वंदना खरमाळे यांनी मालमत्ता जप्तीची नोटीस बजावली आहे. पाचपुते यांचा साईकृपा साखर कारखाना (हिरडगाव) आर्थिक अडचणीत आहे. कारखाना व्यवस्थापन शेतकऱ्यांना एफआरपीनुसार रक्कम देण्यास असमर्थ ठरला आहे. शेतकऱ्यांच्या थकबाकी संदर्भात सहकार मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे कारखान्याची सुनावणी सुरू होती. कारखान्याची मालमत्ता जप्त करण्यासाठी साखर आयुक्तांनी ‘आरआरसी’ (रेव्हेन्यू रिकव्हरी सर्टिफिकेट) प्रमाणपत्र जारी केले होते. या प्रमाणपत्रामुळे जिल्हाधिकारी कारखान्याची मालमत्ता विक्रीस काढून शेतकऱ्यांचे देणे देऊ शकतात. आरआरसी करण्याच्या निर्णयास सहकारमंत्र्यांनी स्थगिती दिली होती. मात्र, कारखान्याचे अपील फेटाळून मालमत्ता विक्रीस आता सरकारने परवानगी दिली आहे. त्यानुसार श्रीगोंद्याच्या तहसीलदार खरमाळे यांनी साईकृपा कारखाना व्यवस्थापनास १७९ आणि १८० नोटीस बजावली आहे. पाच नोटिसा बजावल्यानंतर कारखान्याची सर्व मालमत्ता शासन विक्रीस काढू शकेल, असे खरमाळे यांनी सांगितले. पाचपुते सध्या भाजपात असल्याने या कारवाईस सरकारकडून अगोदर स्थगिती देण्यात आली होती. मात्र, कारवाईचे सरकारचेच धोरण असल्याने जप्तीची प्रक्रिया आता सुरु करण्यात आली आहे.प्रशासनाची नोटीस आज मला पहायला मिळेल. शेतकऱ्यांचे देणे बाकी आहे. लवकरात लवकर पैसे देण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळे कारवाई होणार नाही. -बबनराव पाचपुते