शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये ९२.८९% मतदानाचे रहस्य! ९० लाख मतदारांची नावे कापल्याचा परिणाम; 'व्होटर बेस' घटल्याने टक्केवारी वाढली?
2
Latest Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
3
४ दिवसांमध्ये ₹९६०० नं स्वस्त झाली चांदी; सोन्याचे दर १७०० रुपयांनी घसरले; पटापट चेक करा आजचे दर
4
‘या’ क्रिकेटपटूविना निम्म्याने घटली मुंबई इंडियन्सची ताकद, फलंदाजांचं पितळ पडलं उघडं 
5
इराण युद्ध थांबवायचे की सुरु करायचे...! ट्रम्प यांच्याकडे फक्त ७ दिवस! '१ मे' पूर्वी मोठा निर्णय घेण्याची शक्यता
6
घटस्फोटाआधी दुसरा विवाह मोठा गुन्हा नाही; आरपीएफ कर्मचाऱ्याला हायकोर्टाचा दिलासा
7
देशातील बँकिंग सेक्टरवर 'Mythos' चे सावट; नेमका काय धोका? अर्थमंत्र्यांनी दिला इशारा...
8
E-Bike: ई-बाईक आहे? ऑफिसला जातानाही व्हा मालामाल... 
9
Gautam Adani News: गौतम अदानी १०० अब्ज डॉलरच्या क्लबमध्ये सामील; मुकेश अंबानींना टाकलं मागे
10
Mumbai University: प्रश्नपत्रिका फूटप्रकरणी शिपायावर गुन्हा दाखल, तीन कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस; एक बडतर्फ 
11
बंगालमध्ये पहिल्या टप्प्यातील १५२ पैकी भाजपा किती जागा जिंकणार? अमित शाहांनी थेट आकडाच सांगितला
12
आता फक्त ५ मिनिटांत होणार ब्रेस्ट कॅन्सरचे निदान; 'केईएम'मध्ये अत्याधुनिक मशिन दाखल!
13
मुंबई, महाराष्ट्राचा Video शेअर करत इराणने अमेरिकेला फटकारले; ट्रम्प यांना दिला मोठा सल्ला!
14
मोबाईल फक्त निमित्त! तुमची ऊर्जा गुपचूप चोरणाऱ्या 'या' छुप्या गोष्टी तुम्हाला माहितीय का?
15
दोन दिवसांवर आलेल्या लग्नासाठी घेतलेल्या ३० साड्या, ६० हजार खाक; ४ तोळे सोने गायब
16
बीड कारागृहात राजकीय ड्रामा! वाल्मीक कराड गँगकडून मारहाणीचा आरोप अन् 'त्या' कैद्याचा 'यू-टर्न'
17
'विशाल पाटलांना तिकीट मिळणार नाही हे जयंत पाटील-विश्वजित कदमांना माहीत होतं"; पडळकरांचा मोठा गौप्यस्फोट
18
युद्धाची तयारी की ढासळणारी अर्थव्यवस्था? रशियानं २२ टन सोने विकले; जागतिक बाजारपेठेत खळबळ
19
अमेरिकेच्या युद्धनौकेवर अचानक माकडाने हल्ला चढवला; होर्मुझच्या मोहिमेवर निघालेले...
20
तुमच्या घरात तुळशीच्या बाजूला ‘या’ गोष्टी ठेवल्या नाही ना? लक्ष्मी नाराज होईल, निघून जाईल!
Daily Top 2Weekly Top 5

उत्तर महाराष्ट्र ग्राऊंड रिपोर्ट : कोरोनाने बाजारपेठ बंद; टरबूज सडताहेत शेतातच, शेतकरी चिंतेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2021 04:15 IST

अहमदनगर : वाढत्या उन्हाची दाहकता शरीराला लाहीलाही करून जाते. त्यासाठी अनेक जण उन्हाळी पीक असलेल्या टरबुजाचे सेवन करतात. मात्र, ...

अहमदनगर : वाढत्या उन्हाची दाहकता शरीराला लाहीलाही करून जाते. त्यासाठी अनेक जण उन्हाळी पीक असलेल्या टरबुजाचे सेवन करतात. मात्र, कोरोनाच्या सावटाने बाजारपेठ बंद असल्याने सध्या टरबूज शेतातच सडत आहेत. थंड फळ म्हणून टरबुजाला मोठी मागणी असते. परंतु मागील एका वर्षापासून कोरोनासंक्रमण काळात टरबुजाच्या शेतीचे मोठे नुकसान शेतकऱ्यांना सोसावे लागत आहे. सध्या बाजारपेठा बंद असल्याने शेतात टरबूज पडून आहेत. त्यामुळे सर्व टरबूज खराब होण्याच्या मार्गावर आहेत. जिल्ह्यात दोन हजार एकर शेतजमिनीवर टरबुजाची लागवड करण्यात आलेली आहे. परंतु लॉकडाऊनमुळे बाजारपेठा बंद आहेत. त्यामुळे शेतातील टरबूज कुठे विक्री करावे, असा प्रश्न शेतकऱ्यांना आहे. टरबुजाची शेतीही महाग आहे. बी-बियाण्यापासून तर टरबुजाची वाढ होईपर्यंत शेतकऱ्यांना टरबुजाला जपावे लागते. कीड लागू नये म्हणून अनेक महागड्या रासायनिक द्रव्यांचा वापर करावा लागतो. ही सर्व रासायनिक औषधे महागडी आहेत. सध्या लागवडीचा खर्चसुद्धा या टरबूज उत्पादनातून निघत नाही.--

तापमान वाढल्याने वेली करपल्या

महिन्यापूर्वी टरबुजांच्या वेली कळी अवस्थेत असताना अचानक तापमान वाढले. त्यामुळे अनेक ठिकाणच्या टरबूज वेली करपून गेल्या तर काही ठिकाणी वेलीच्या कळ्यांची गळ झाली. त्यामुळे त्याचा परिणाम उत्पादनावर झाला आहे. त्यातच पुढे कडक लाॉकडाऊन सुरू झाल्याने उत्पादन झालेला माल ग्राहकांअभावी शेतातच राहिला आणि करपून गेल्याचे शेतकरी सांगत आहेत.

---

लॉकडाऊनमुळे बाजारपेठा बंद आहेत, तर काही ठिकाणी मर्यादित वेळा दिल्याने टरबूज विक्रीची समस्या निर्माण झाली आहे. सध्या शेतात टरबूज मोठ्या प्रमाणात लागले आहेत. कोरोनामुळे टरबूज खरेदी करण्यास व्यापारी धजावत नाहीत. त्यामुळे शेतातील टरबुजांची विक्री कुठे करावी? असा प्रश्न आहे. लागवडीचा खर्चही या वर्षी निघाला नाही. त्यामुळे शासनाने फळबाग लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी.

- डॉ. शिवनाथ घोरपडे,

शेतकरी, पिंपरी निर्मळ, ता. राहाता.

--

फोटो- मेलवर (सीडी व फोटोडेस्क)