शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
2
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
3
"माझ्यामध्ये दैवीशक्ती आहे, कॅन्सरसारखे आजारही बरे करतो", संगमनेरमधील भोंदूबाबा गजाआड
4
PM मोदींचे भाषण अन् कारमधला फोटो... 'युवा आमदार' मैथिली ठाकूर होतेय ट्रोल, कारण...
5
१२ कोचची नॉन-AC ट्रेन, आजपर्यंत मिळाल्या नाहीत अशा १० सेवा मिळणार; प्रवाशांना मोठा फायदा!
6
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
7
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
8
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
9
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
10
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
11
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
12
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
13
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
14
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
15
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
16
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
17
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
18
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
19
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
20
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
Daily Top 2Weekly Top 5

न्ख्रिसमसचा उत्साह शिगेला

By admin | Updated: December 22, 2015 23:11 IST

अहमदनगर : ख्रिस्ती बांधवांच्या परमोच्च आदराचे प्रतीक असलेला नाताळ सण अवघ्या चार दिवसांवर येऊन ठेपला असून, ख्रिस्ती बांधवांच्या उत्साहाला उधाण आले आहे़

अहमदनगर : ख्रिस्ती बांधवांच्या परमोच्च आदराचे प्रतीक असलेला नाताळ सण अवघ्या चार दिवसांवर येऊन ठेपला असून, ख्रिस्ती बांधवांच्या उत्साहाला उधाण आले आहे़ नाताळ म्हणजे येशूचा जन्मोत्सव. हा सण नगर शहरासह जिल्ह्यात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो़़ शहरातील ह्युम मेमोरियल चर्च, संत अन्ना चर्च, सेंट सेव्हिअर्स कॅथेड्रल चर्च तसेच भिंगार येथील संत जॉन चर्च, क्राईस्ट चर्च आदी ठिकाणी नाताळानिमित्त विविध धार्मिक व सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे़ सर्व चर्चमध्ये साफसफाई आणि रंगरंगोटीची कामे करून आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे़ चर्चमध्ये येशूच्या जन्माचा देखावा सादर केला जातो. तो तयार करण्याच्या आणि सजावटीच्या कामाला प्रारंभ झाला आहे. चर्चमध्येच नव्हे तर अनेक ख्रिश्चन बांधव आपल्या घरी अथवा वसाहतीतही अशा प्रकारच्या जन्मोत्सवाच्या गव्हाणी तयार करतात. त्यांचीही तयारी सुरू आहे. शहरातील भेटवस्तूंच्या दुकानांतही ख्रिसमसचा प्रभाव जाणवू लागला आहे. अनेक आकर्षक भेटवस्तू आणि शुभेच्छा कार्डस्, जिंगल बेल, ख्रिसमस ट्री ची प्रतिकृती, फुगे आणि अन्य सजावटीचे साहित्य विक्रीसाठी दाखल झाले आहेत. तसेच खास ख्रिसमस केक, पेस्ट्रीज, चॉकलेट्सही विक्रीसाठी उपलब्ध आहेत. प्रत्येक वस्तूची किंमत त्याचा आकार आणि दर्जानुरूप आहे. अनेक दुकानदारांनी ख्रिसमससाठी फेस्टिव्हल आॅफर्स आणल्या आहेत. त्यामुळे सवलतीच्या दरातही साधने उपलब्ध आहेत. (प्रतिनिधी)ााताळात टोपी आणि सांताक्लॉजच्या मुखवट्यांना मोठी मागणी असते़ नगर शहरात आम्ही गेल्या सहा वर्षांपासून टोप्या विक्रीसाठी येतो़ दहा दिवस येथे चांगली विक्री होती़ या काळात पुढील दोन ते तीन महिन्यांचा रोजीरोटीचा प्रश्न मार्गी लागतो़ दिल्ली येथून माल खरेदी केला जातो़ -बाबुलाल बागरीया, विक्रेते.