साई संस्थानला महिनाभरात नवे विश्वस्त मंडळ

By Admin | Updated: November 29, 2014 00:00 IST2014-11-28T23:59:55+5:302014-11-29T00:00:55+5:30

शिर्डी : गेल्या तीन वर्षांपासून रखडलेले संस्थानचे विश्वस्त मंडळ नेमणुकीच्या हालचाली सुरू झाल्या असून महिनाभरात नवीन विश्वस्त मंडळ अस्तित्वात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे़

A new trust board will be organized within a month to the Sai Institute | साई संस्थानला महिनाभरात नवे विश्वस्त मंडळ

साई संस्थानला महिनाभरात नवे विश्वस्त मंडळ

शिर्डी : गेल्या तीन वर्षांपासून रखडलेले संस्थानचे विश्वस्त मंडळ नेमणुकीच्या हालचाली सुरू झाल्या असून महिनाभरात नवीन विश्वस्त मंडळ अस्तित्वात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे़ या मंडळात वर्णी लागावी यासाठी अनेकांनी फिल्डींग लावली आहे़
एका जनहित याचिकेमुळे २६ मार्च २०११ रोजी न्यायालयाने जयंत ससाणे यांच्या अध्यक्षतेखालील विश्वस्त मंडळ बरखास्त केले होते़ तेव्हापासून संस्थानचा कारभार पहाण्यासाठी उच्च न्यायालयाच्या नियंत्रणाखाली जिल्हा प्रधान न्यायधीशांच्या अध्यक्षतेखाली त्रिसदस्यीय समिती गठीत करण्यात आली आहे़ या समितीत नगरचे जिल्हाधिकारी व संस्थानच्या कार्यकारी अधिकाऱ्यांचा समावेश आहे़
पावणेतीन वर्षात आघाडी सरकार अन्य महामंडळा प्रमाणेच संस्थानचे व्यवस्थापन मंडळही नियुक्त करु शकले नाही़ या मंडळात अध्यक्ष, उपाध्यक्षांसह सोळा सदस्य आहेत़ आघाडी सरकारच्या फॉर्म्युल्यानुसार शिर्डी देवस्थान काँग्रेसकडे तर सिद्धीविनायक देवस्थान राष्ट्रवादीकडे होते़ शिर्डीत काँग्रेसच्या अध्यक्षांसह आठ सदस्य तर राष्ट्रवादीचे उपाध्यक्षांसह आठ सदस्य नियुक्त करण्यात आले होते़ मात्र या राजकीय नियुक्त्यांनाही न्यायालयात आव्हान देण्यात आले होते़
(तालुका प्रतिनिधी)

Web Title: A new trust board will be organized within a month to the Sai Institute