नेवासा तालुक्यात दहावीचा निकाल शंभर टक्के
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:16 IST2021-07-18T04:16:07+5:302021-07-18T04:16:07+5:30
भेंडा : नेवासा तालुक्यातील ७२ विद्यालयातील ५ हजार ८८८ विद्यार्थी दहावीच्या परीक्षेला बसले होते. सर्व विद्यार्थी परीक्षेत उत्तीर्ण झाल्याने ...

नेवासा तालुक्यात दहावीचा निकाल शंभर टक्के
भेंडा : नेवासा तालुक्यातील ७२ विद्यालयातील ५ हजार ८८८ विद्यार्थी दहावीच्या परीक्षेला बसले होते. सर्व विद्यार्थी परीक्षेत उत्तीर्ण झाल्याने तालुक्याचा दहावीचा निकाल १०० टक्के लागला आहे.
यावेळी सर्वात जास्त ४६४ विद्यार्थी घाडगे पाटील माध्यमिक विद्यालय नेवासा फाटा, तर सर्वात कमी फक्त ६ विद्यार्थी तक्षीला इंग्लिश स्कूल देडगाव येथून परीक्षेला बसले होते. मागील वर्षी १४ विद्यालयाचा निकाल १०० टक्के होता. यावेळी सर्व विद्यालयांचा निकाल १०० टक्के लागला आहे. ५ हजार ८८८ पैकी २ हजार ९ विशेष प्रावीण्य, २ हजार ४७५ विद्यार्थी प्रथम श्रेणी, १ हजार ३३१ विद्यार्थी द्वितीय श्रेणी, तर ७३ विद्यार्थ्यांना उत्तीर्ण श्रेणी मिळाली आहे.